VIDEO : कल्याण स्टेशनवर आरपीएफ कर्मचाऱ्याकडून महिलेची छेडछाड

देशात महिला अजूनही असुरक्षित असल्याचे विविध घटनांवरुन समोर येतंय.

Updated: Jun 20, 2018, 05:06 PM IST

कल्याण : देशात महिला अजूनही असुरक्षित असल्याचे विविध घटनांवरुन समोर येतंय. अशीच काहीशी घटना पुन्हा एकदा घडलीय. कल्याण रेल्वे स्थानकात आरपीएफ कर्मचाऱ्यानं महिलेशी गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ समोर आलाय. १८ जून रोजी कल्याण रेल्वे स्थानकात ही घटना घडलीय. राजेश जांगे नावाचा आरपीएफ कर्मचारी रेल्वे स्थानकातील बेंचवर बसला होता. यावेळी शेजारी बसलेल्या महिलेला राजेश जांगे स्पर्श करत होता. जांगेचे हे कृत्य समोर बसलेल्या प्रवाशांनं आपल्या कॅमेऱ्यात व्हिडीओ स्वरुपात कैद केलं. इतर प्रवाशांनाही ही बाब समजताच त्यांनी राजेश जांगेची धुलाई केली. आरपीएफनेही या घटनेची गंभीर दखल घेत राजेश जांगेवर निलंबनाची कारवाई केलीय.