मराठी भाषिकांच्या मेळाव्यात कन्नड रक्षण वेदिकेचा राडा

 कन्नड रक्षण वेदिकेचा धिंगाणा 

Updated: Nov 1, 2020, 01:34 PM IST
मराठी भाषिकांच्या मेळाव्यात कन्नड रक्षण वेदिकेचा राडा title=

मुंबई : मराठा मंदिर इथं शांतपणे मराठी भाषिकांचा मेळावा सुरू असताना कन्नड रक्षण वेदिकेचा धिंगाणा पाहायला मिळाला. मराठा मंदिराकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कन्नड रक्षण वेदिका आणि पोलीसांमध्ये प्रचंड धक्काबुक्की झाली. त्यानंतर बेळगावात सीमावासीयांकडुन कर्नाटक सरकारचा निषेध करणाऱ्या सभेला सुरुवात झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. .यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की पाहायला मिळाली.

बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे च्या घोषणांनी बेळगावातील मराठा भवन दुमदुमलय.  दडपशाही करणाऱ्या कर्नाटक सरकारचा यावेळी निषेध नोंदवला गेलाय.

पोलिसांनी मोठ्या प्रयन्तानन्तर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर गनिमी काव्याने बेळगावमध्ये दाखल झाल्या. बेळगाव इथल्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात निषेधाचा कार्यक्रम घ्यायला कर्नाटक पोलिसांनी मनाई केली. 

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना एकत्र यायला मनाई करण्यात आली.

शिवसेना कार्यालयाबाहेर कर्नाटक पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळाला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी एकत्र येवू नये असा दम कानडी पोलिसांनी दिलाय. कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.