कोरेगाव-भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाचा होणार कायापालट

Koregaon-bhima : शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुणे (Pune) जिल्ह्यातील कोरेगाव-भीमामध्ये (Koregaon-bhima) आज 204 वा शौर्यदिन साजरा करण्यात आला.  

Updated: Jan 1, 2022, 01:09 PM IST
कोरेगाव-भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाचा होणार कायापालट title=

मुंबई : Koregaon-bhima : शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुणे (Pune) जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा (Koregaon-bhima) येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या परिसरात (Vijay stambh area development) अनेक विविध सोयी-सुविधा करण्यात येणार याहे. त्यामुळे येथील परिसराचा कायापालट होणार आहे. आज कोरेगाव भीमामध्ये 204 वा शौर्यदिन साजरा करण्यात आला. मध्यरात्री 12 वाजता बुद्धवंदना करण्यात आली. यावेळी विविधरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. (Koregaon bhima -Vijay stambh area development)

204 वा शौर्यदिन साजरा करताना विविधरंगी फुलांच्या सजावटीसह विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला. मध्यरात्रीपासून विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनीही विजयस्तंभाला अभिवादन केले. 

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

 ऐतिहासिक विजयस्तंभ परिसरात मूलभूत सोयी सुविधा (Basic facilities), सुशोभिकरण (beautification) आणि अन्य विकासाची तसेच शौर्य दिन तसेच दीर्घकालीन उपक्रमांचे आयोजन आणि नियोजन यापुढे सामाजिक न्याय विभागामार्फत (Social justice department) करण्यात येणार आहे. तर या परिसराचा विकास आणि सुशोभीकरणासाठी समिती गठित (committee constituted) करण्यात आली आहे.

या स्थळाचा विकास आणि सुशोभीकरण करण्यासाठी 100 कोटी रुपयांपर्यंतचा बृहत विकास आराखडा तयार करण्यात आलाय. दरम्यान, विजयस्तंभ आणि परिसराचा विकास करताना भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जावी यासाठी जिल्हाधिकारी पुणे, यांच्या मार्फत भूसंपादन प्रक्रियेचा 30 टक्के निधी तातडीने वितरित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

बृहत विकास आराखड्यासाठी समिती

बृहत विकास आराखडा तयार करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी आणि समाज कल्याण आयुक्त यांची समितीही गठीत करण्यात आली.याशिवाय एक जानेवारीच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठीही एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पुण्याचे पोलीस आयुक्त, बार्टीचे महासंचालक धम्मज्योति गजभिये, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश आहे.