जमीन व्यवहार प्रकरण : रावल यांना भाजपकडून अभय

मंत्री जयकुमार रावल यांना भाजपकडून अभय मिळालेय.  जमीन अपहार प्रकरणांवर पक्षाकडे खुलासा करण्यासाठी रावल यांनी काल दिल्लीत गाठीभेटी घेतल्या.  

Updated: Feb 10, 2018, 08:53 AM IST
जमीन व्यवहार प्रकरण : रावल यांना भाजपकडून अभय title=

नवी दिल्ली : मंत्री जयकुमार रावल यांना भाजपकडून क्लिनचिट देण्यात आली आहे. रावल यांच्यावर होत असलेल्या जमीन अपहार प्रकरणांवर पक्षाकडे खुलासा करण्यासाठी रावल यांनी काल दिल्लीत गाठीभेटी घेतल्या. त्यावेळी त्यांना  पक्षाकडून अभय देण्यात आले.

(काय आहे हे प्रकरण, अधिक वाचण्यासाठी क्लिक करा )

पक्षाकडे केला खुलासा 

रावल यांनी दिल्लीत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. रावल यांच्यावर होत असलेल्या जमीन अपहार प्रकरणांवर पक्षाकडे खुलासा करण्यासाठी त्यांनी ही भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. 

आरोप राजकीय हेतूने - रावल

रावल यांनी यावेळी कागदपत्रं सादर करून आपल्यावरील आरोप राजकीय हेतूनं केल्याचं सांगितलं. या भेटीनंतर दानवेंनी रावल यांना क्लिनचिट दिली आहे. प्रथमदर्शनी यात काही चुकीचा व्यवहार झाला नसल्याचं सांगत पक्ष रावल यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचं दानवे यांनी म्हटलंय.