शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर जिल्ह्यातील औसा शहराला पाणी पुरवठा करणारा तावरजा मध्यम प्रकल्प ऐन पावसाळ्यातही कोरडा ठाक आहे. परिणामी औसा शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून शहराला ४० ते ४५ दिवसातून एकदा नळाद्वारे पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरु असून अनेकांना पाणी विकत घ्यावं लागतय.
लातूर जिल्ह्यातील औसा हे तालुक्याचे ठिकाण. नेहमी दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या औसा शहरात यावर्षी ऐन पावसाळ्यातच तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. औसा शहराला पाणी पुरवठा करणारे तावरजा मध्यम हा असा कोरडा ठाक पडलेला आहे. परिणामी नगर परिषदेतर्फे अधिग्रहित केलेल्या बोअर्स आणि विंधन विहिरीतून ४० ते ४५ दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय.
परिणामी पाण्यासाठी चिमुकल्यांसह अनेकांना पाण्यासाठी ही अशी पायपीट करावी लागते. शहरातील फिल्टर पॉईंटपासून पिण्याचे पाणी घेऊन जातात. मात्र सांड पाण्यासाठी विकतच्या पाणी घ्यावं लागतं. त्यात गेल्या काही दिवसानापासून लॉकडाऊन होता. त्यामुळे खाण्यासाठी पैसा वापरावा की पाण्यासाठी असा प्रश्न औसेकरांना पडलाय.
महिन्यातून एकदा पाणी. दररोज १२० रुपये पाणी विकत घेणे इतके दिवस लॉकडाऊन होता. त्यामुळे आता पाण्यात पैसा खर्च होतोय. आम्ही पाणी मागतोय पण अजूनही म्हणावा तास पाणी पुरवठा होत नसल्याचे शाम रसाळ या नागरिकांनी सांगितले.
औसा शहरानंतर दोन महिन्यांनंतर पाणी येऊ शकते. बरेच बोअर बंद आहेत. तवराज प्रकल्प कोरडा आहे. लातूर हे ट्रेन म्हणून पाणी होते पण औसाळा ट्रॅक ट्रेन नाही तर पाणी नाही. म्हणून मकणी धरणाच्या पाण्याची विनंती नागरिक करतायत.
औसा शहराशिवाय २० खेडी पाणी पुरवठा योजना आणि अनेक शेतकऱ्यांना रब्बीत तावरजा प्रकल्पाचा आधार असतो. मात्र यावर्षी खरिपातील पिकांसाठी उपयुक्त पाऊस झाला असून शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी आणि रब्बी हंगामाची चिंता आहे.
औसा शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंगा तालुक्यातील माकणी प्रकल्पातून पाणी आणण्याचे आश्वासन दिले होते. ते काम अंतिम टप्प्यात असून तीन ते चार महिन्यात ते पाणी येईल मात्र तोपर्यंत आलमला येथून पाण्याची व्यवस्था करू असे आश्वास औसाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी दिले आहे.
प्रकल्प कोरडा पडला आहे अर्धा पावसाळा संपला आहे. सर्वत्र जोरदार पाऊस, पूर येत आहेत. पण तावरजा मध्यम प्रकल्पात पाणी पाणी नाही. केवळ खरिपातील पिके येथील परंतु रब्बी हंगामात अडचण होणार आहे. प्रकल्प योजनेतील औसा शहर आणि २० गावे अवलंबून आहेत.
तावरजेत पाणी नसल्यामुळे अडचण. काळजी करण्याचे कारण नाही. बोअर, विहीरीत मुबलक पाणी आहे. त्यातून सोय. माकणीची योजना अंतिम टप्प्यात आहे सुरु होण्यास ३ ते ४ महिने वेळ आहे. तो पर्यंत पर्यायी व्यवस्था माकणीचे पाणी आलमला इथे आणून औसेकरांना देऊ तसेच अधिकचे टँकर वाढवू असे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.
परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावून कोरड्या पडलेल्या तावरजा मध्यम प्रकल्प तुडुंब भरावा अशीच अपेक्षा औसेकर नागरिक करीत आहेत. मात्र जरा पावसाने दगा दिलाच तर पाण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.