चिमुरड्या कुशच्या खुनातला आरोपी, आयुष पुगलियाचा खून

कुश कटारिया या बहुचर्चित खून प्रकरणातला प्रमुख आरोपी आयुष पुगलिया याचा खुन करण्यात आलाय. 

Updated: Sep 11, 2017, 01:37 PM IST
चिमुरड्या कुशच्या खुनातला आरोपी, आयुष पुगलियाचा खून title=

नागपूर : नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्याचा खून करण्यात आलाय. कुश कटारिया या बहुचर्चित खून प्रकरणातला प्रमुख आरोपी आयुष पुगलिया याचा खुन करण्यात आलाय. कैद्यांचे भांडण झाले, त्याचे पर्यवसान आयुष पुगलियाच्या खूनात झाले. 

कुश कटारिया बहुचर्चित खून प्रकरण

उद्योजक 'सुरुची मसालेवाले' यांचा मुलगा कुश कटारिया, या ८ वर्षाच्या चिमुकल्याचं, ११ ऑक्टोबर २०११ रोजी, राहत्या घरातून अपहरण करण्यात आलं होतं. कुशच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांचा दोन कोटींची खंडणी मागितली होती.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर त्याच्याच इमारतीत राहणाऱ्या आयुष पुगलियाला अटक होती. आयुषपाठोपाठ आयुषचे भाऊ नितीन आणि नवीनलाही अटक करण्यात आली. तिघांच्या अटकेनंतर चार दिवसांनी कळमना भागातल्या एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत कुश कटारियाचा मृतदेह सापडला होता.

अपहरण आणि हत्येनंतर जनप्रक्षोभाच्या पार्श्वभूमीवर या हत्याकांडाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. या हत्येप्रकरणी ५९ जणांच्या साक्षी घेण्यात आल्या होत्या.

कुश कटारिया अपहरण- हत्येप्रकरणी आरोपी आयुष पुगलियाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. नागपूर जिल्हा ससत्र न्यायालयाने हा निर्णय दिला होता.