Maharashtra Breaking News LIVE Updates: प्रसिद्ध उद्योजक अभिषेक वर्मा यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Breaking News LIVE Updates:  दिवसभरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर मिळवा. 

Maharashtra Breaking News LIVE Updates:  प्रसिद्ध उद्योजक अभिषेक वर्मा यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Breaking News LIVE Updates:  दिवसभरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर मिळवा. 

30 Jan 2025, 21:48 वाजता

 प्रसिद्ध उद्योजक अभिषेक वर्मा यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

30 Jan 2025, 20:53 वाजता

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर व हुसेन दलवाई उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला. काँग्रेसचे दोन नेते एकनाथ शिंदेच्या भेटीला आल्याने चर्चेला उधाण आले. भेटीचा कारण गुलदस्तात आहे. 

30 Jan 2025, 20:13 वाजता

मराठा आरक्षणावरील निर्णय महायुती सरकारने घेतले... मराठा आरक्षणावरील जे काही निर्णय घेतले आहेत ते महायुती सरकारने घेतले आहेत. तसेच कायद्याच्या चौकटीमध्ये जे काही बसेल ते सगळं आम्ही करणार आहोत. मनोज जरांगे यांनी आदोलन स्थगित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली. 

30 Jan 2025, 19:06 वाजता

बोरिवली, दहिसर, सायन कोळीवाडा, दक्षिण मुंबईमधून, आहील्यानगर येथील ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश करणार आहेत.  

30 Jan 2025, 18:28 वाजता

मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईतील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचे प्रयत्न करणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. 

30 Jan 2025, 18:13 वाजता

समाजातील सर्वांना मोफत शिक्षणाचा मुलभूत हक्‍क मिळावा यासाठी सत्‍यशोधक सर्वोदय संघटनेतर्फे विनोबा भावे यांच्‍या जन्‍मगावी गागोदे इथं आंदोलन सुरू केले आहे. संघटनेच्‍यावतीने संदीप पाटील हे आमरण उपोषणास बसले आहेत. सरकारच्‍या धोरणामुळे राज्‍यातील 14 हजार प्राथमिक शाळा बंद पडण्‍याच्‍या मार्गावर आहेत. त्‍यामुळे या गावातील मुलांना विकतचे शिक्षण घ्‍यावे लागणार आहे. सामान्‍य कुटुंबातील मुलांना खाजगी शिक्षण परवडणारे नाही. शिक्षणाच्या खासगीकरणामुळे गरिबांची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत असल्‍याची तक्रार संदीप पाटील यांची आहे.

30 Jan 2025, 17:41 वाजता

मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मुंबईत बांग्लादेशी व रोहिंग्याची घुसखोरी वाढली आहे. त्यासाठी एक समिती गठीत करावी. त्यासाठी एनजीओंना सोबत घेऊन एक समिती गठीत करावी. संक्रमण शिबिरात ही घुसखोर वाढली आहे. या घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी एक मोहिम हाती घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली. 

30 Jan 2025, 17:02 वाजता

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज हंडा मोर्चा काढण्यात आला. पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत येणार्‍या भागामधील पाण्याचा प्रश्न खूप बिकट झाला आहे. वारंवार आधिकार्यांना निवेदन, समक्ष भेटूनही ते दाद देत नाहीत. सर्व ठेकेदाराच्या नावावर ढकलतात असा आरोप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आज केला. तसेच अधिकारी व ठेकेदार वादामुळे नागरिकांना पाणी मिळणे अवघड झाले आहे असं शिवसैनिकांचे म्हणणे आहे. यासाठी भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने हंडा मोर्चा काढण्यात आला.

30 Jan 2025, 16:14 वाजता

मनोज जरांगे यांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे. आता आपण आंदोलन स्थगित करत आहोत बंद करत नाही अशी घोषा जरांगे यांनी केली.  यापुढे उपोषण नाही,समोरा समोर लढणार असे मनोज जरांगे म्हणाले. 

30 Jan 2025, 15:35 वाजता

महाकुंभातल्या चेंगराचेंगरीमुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भावुक झाले. घटनेतल्या पीडितांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या. मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपयांची मदत घोषित केली आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x