Maharashtra Breaking News LIVE Updates : आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर राज्यात एकिक़डे (vidhansabha Election 2024) आचारसंहिता आणि निवडणुकीच्या तारखांची प्रतीक्षा असतानाच दुसरीकडे दिल्ली दरबारी असणाऱ्या नेत्यांचे महाराष्ट्र दौरे चर्चेचा विषय ठरत आहेत.
5 Oct 2024, 21:31 वाजता
शिर्डीतल्या साईबाबांच्या चरणी 1 कोटी रुपयांची सोन्याची पंचारती अर्पण करण्यात आली आहे. 1 किलो 434 ग्रॅम वजनाची आकर्षक नक्षीकाम असलेली ही सोन्याची पंचारती आहे. मुंबई इथल्या एका साई भक्ताकडून तब्बल एक कोटी रुपयांचे सुवर्णदान करण्यात आलं आहे. नाव जाहीर न करण्याची साईभक्ताने संस्थानला विनंती केली आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी ही माहिती दिलीय
5 Oct 2024, 19:56 वाजता
मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुयारी मेट्रो लाईन 3चं उद्घाटन केलं. मोदींनी वांद्रे इथे मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्यातील मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. तसंच वांद्रे ते सांताक्रुझ मेट्रोनं प्रवासही केला. या दरम्यान विद्यार्थी आणि लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांशी, तसंच मजुरांशी त्यांनी यावेळी संवादही साधला. पीएम मोदींच्या हस्ते तब्बल 32 हजार कोटींच्या विविध विकासकामांचं उद्घाटन करण्यात आलं.
5 Oct 2024, 17:24 वाजता
मविआ सरकारमुळे जनतेच्या पैशांचा चुराडा - पीएम मोदी
काँग्रेस हा देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष असल्याचा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ठाण्यातल्या सभेत बोलताना पीएम मोदी यांनी काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीवरही निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीने अनेक प्रकल्प थांबवले. मविआ सत्ते आल्यास महायुतीच्या सर्व योजना बंद करतील, कुशासन ही मविआची ओळख आहे. लाडकी बहिण योजना ही मविआला आवडलेली नाही. दुष्काळी भागातील अनेक योनजा मविआने बंद केल्या अशी टीका पीएम मोदी यांनी केलीय.
5 Oct 2024, 16:42 वाजता
वाशिममधल्या पोहरादेवीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ठाण्यात आगमन झालं आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं. कासारवडवली भागात वालावलकर मैदानात मोदींचा कार्यक्रम होतोय. मोदींच्या स्वागतासाठी ठाण्यात जागोजागी बॅनर्स लावण्यात आलेत.
5 Oct 2024, 15:15 वाजता
'सरकारमधील सर्व गद्दार बेरोजगार होणार' उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा
'सरकारमधील सर्व गद्दार बेरोजगार होणार असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेला लगावला आहे. मोदीजी कितीही फिती कापा एकाही गद्दाराला रोजगार देणार नाही असं सांगत उद्धव ठाकरे यंनी पीएम नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
5 Oct 2024, 14:16 वाजता
राज्य सरकारकडून पेसा भरतीबाबत जीआर जाहीर
पेसाभरतीसाठी आदिवासी आमदारांची मंत्रालयात केलेल्या आंदोलनाला यश आलंय.. राज्य सरकारकडून पेसा भरतीबाबत GR काढण्यात आलाय.. त्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित 17 संवगरगर्तील सरळसेवेची पदे भरण्याबाबत सरकारनं परवानगी दिलीये.. पेसा भरतीच्या मागणीसाठी आदिवासी आमदारांनी काल मंत्रालयाच्या संरक्षण जाळ्यांवर उड्या मारुन आंदोलन केलं होतं.. तसंच काल दिवसभर सरकार विरोधात धरणं आंदोलनही केलं होतं.. त्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतलाय.
5 Oct 2024, 13:47 वाजता
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.. सकाळी नरेंद्र मोदी वाशिममध्ये दाखल झाले. पीएम मोदींनी पोहरादेवीचं मोदी दर्शन घेतलं. त्यानंतर विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर मोदी ठाणे आणि मुंबईत येणार आहे.. त्याआधी केलेल्या भाषणात पीएम मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. गरीबी वाढवणं हेच काँग्रेसचं धोरण आहे. मविआ सरकारच्या काळात सर्व योजनांना ब्रेक लावला अशी टीका पीएम मोदी यांनी केली.
5 Oct 2024, 13:35 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates : पोहरादेवीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिंकली जनतेची मनं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पोहरादेवी इथं अनेक विकासकामांचं उद्धाटन करण्यात आलं. इथं, बंजारा विरासत संग्रहालयाला भेट देण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. लाडकी बहीण योजना बहिणींचा सन्मान वाढवणारा असल्याचं वक्तव्य यावेळी पंतप्रधानांनी केलं.
5 Oct 2024, 13:17 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates : आदिवासी आमदारांची मागणी पूर्ण
राज्य सरकारकडून पेसा भरतीबाबत GR जाहीर. अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित 17 संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्याबाबत सरकारकडून जीआर जाहीर. पेसा भरती संदर्भात जीआर काढा या मागणीसाठी काल आदिवासी नेत्यांनी मंत्रालयात उडी मारून सरकारच्या विरोधात आंदोलन केलं होतं. शुक्रवारी दिवसभर सरकार विरोधात धरणे आंदोलन केल्यानंतर सरकारकडून जीआर जाहीर. सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना सरकारने घेतला निर्णय. कोर्टाच्या अधीन राहून मानधन तत्वावर नियुक्ती करण्याचा निर्णय. आदिवासी आमदारांच्या आंदोलनाला यश.
5 Oct 2024, 12:25 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates : राहुल गांधीनी दलित कुटुंबाच्या घरी जेवण बनवले आणि..
लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी कोल्हापुरात पोहोचताच उचगाव मध्ये राहत असणाऱ्या दलित कुटुंब अजयकुमार तुकाराम सनदे यांच्या घरी भेट दिली. जवळपास सनदे यांच्या घरात राहुल गांधी एक तासाहून अधिक काळ थांबले होते. या दरम्यान राहुल गांधी यांनी या कुटुंबाची पूर्ण माहिती घेतली आणि त्याचबरोबर, किचनमध्ये स्वता भाजी बनवत कुटुंबासोबत जेवण देखील केलं. आमचा भाऊ आमचा मामाच आमच्या घरी आला अशी भावना या कुटुंबाने व्यक्त केली.