Maharashtra Breaking News LIVE Updates: अमृत योजनेअंतर्गत कल्याण-डोंबिवलीसाठी 357 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस मान्यता

Maharashtra Breaking News LIVE Updates: दिवसभरात नवीन वर्षात काय काय झालं सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर 

Maharashtra Breaking News LIVE Updates: अमृत योजनेअंतर्गत कल्याण-डोंबिवलीसाठी 357 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस मान्यता

Maharashtra Breaking News LIVE Updates: नवीन वर्षाला सुरुवात झाली असून काल दिवसभरात काय झालं आणि आता काय होणार आहे. याविषयी एका क्लिकवर जाणून घेऊया.

2 Jan 2025, 13:11 वाजता

बीड हत्या प्रकरणात माझा संबंध नाही - धनंजय मुंडे

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात एस आय टी चे पथक थोड्याच वेळात केजमध्ये तपासासाठी दाखल होणार आहेत. पथकाचे प्रमुख बसवराज तेली हे थोड्याच वेळात केजला पोहोचणार आहेत. बसवराज तेली घेणार तपासाचा आढावा. मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची तेली घेणार भेट. धनंजय देशमुख आणि एस आय टी चे इतर अधिकारी यांच्यात केज येथे शासकीय विश्रामगृहात चर्चा सुरू तर धनंजय देशमुभ हे संतोष देशमुख यांच्या हत्येची बसवराज तेली यांना देणार माहिती. तर या सगळ्यावर धनंजय मुंडे म्हणाले की त्यांचा या हत्या प्रकरणात माझा संबंध नाही. माझ्या संदर्भातील निर्णय आमच्या पक्षाचे नेते अजित पवार घेतील. 

2 Jan 2025, 12:32 वाजता

राज्य मंत्री मंडळ बैठकीस सुरुवात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीस उपस्थित. त्यासोबत मंत्री गिरीश महाजन, धनंजय मुंडे, अतुल सावे, आशिष शेलार, नितेश राणे, पंकजा मुंडे, गुलाबराव पाटील, भरत गोगवले, जयकुमार रावल, शिवेंद्र राजे, गणेश नाईक, दादा भुसे, बाबासाहेब पाटील यांची ही बैठकीस हजेरी

2 Jan 2025, 11:32 वाजता

पदभार न स्वीकारलेल्या मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे खडेबोल

तात्काळ आपल्या खात्याचा पदभार स्वीकारा, अशी कान उघडणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. अशा प्रकारे ज्या मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नाही त्यांची देवेंद्र फडणवीसांनी कानउघडनी केली आहे. कमी महत्त्वाचं खातं मिळाल्यानं अनेकांची नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यावरून अनेकांनी त्यांच्या पदभार स्वीकारला नाही. 

2 Jan 2025, 11:22 वाजता

कल्याण अत्याचार प्रकरणात विशाल गवळीला 2 दिवसांची कोठडी

आरोपी विशाल गवळी आणि पत्नी साक्षी गवळी दोघांना कल्याण न्यायालयात हजर केले. सुनावणी दरम्यान पीडित मुलीच्या आई आणि वडील देखील न्यायालयामध्ये दाखल झाले होते. न्यायालयामध्ये आई आणि वडिलांची साक्ष नोंदवल्याचे म्हटले जाते तर या सगळ्यात विशाल गवळीला पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

 

2 Jan 2025, 10:35 वाजता

मी नाराज नाही, दोन दिवसांत भूमिका मांडणार; राजन साळवी स्पष्टचं बोलले

पक्षात येणाऱ्या माणसाचं स्वागत करण हे प्रत्येक पक्षाच काम असतं. पदाधिकारी ठाकरेंना सोडून जाण्यास तयार नाहीत. तर दुसरीकडे राजन साळवी हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. याविषयी बोलताना राजन साळवी म्हणाले ते नाराज नाहीत आणि दोन दिवसांत भूमिका मांडणार. दोन दिवसांपूर्वी साळवेंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली होती. याशिवाय नाराज असल्याच्या अफवा फेटाळल्या आहेत. 

2 Jan 2025, 10:22 वाजता

आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार परदेशातून परतणार असल्याची माहिती 

राज्यात सुरु असलेल्या बीड प्रकरणावर आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर पवार बोलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धनंजय मुंडे यांच्याविषयी अजित पवार बोलणं टाळत असल्याने विरोधकांकडून टीका होत आहेत.  बीड प्रकरण आणि मंत्र्यावर होत असलेल्या आरोपांवर दादा बोलणार का? हे पाहणं महत्त्वाचे

2 Jan 2025, 10:22 वाजता

अमेरिकेच्या लास वेगासमध्ये ट्रंप टॉवरबाहेर टेस्ला सायबर ट्रॅकमध्ये आग

या अपघातात एकाचा मृत्यू 7 जण जखमी. दहशतवादी हल्ल्याच्या दृष्टीने तपास सुरु आहे. लास वेगासमधल्या ट्रम्प हॉटेल बाहेरच्या स्फोटाचा तपास सुरू आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची माहिती, न्यू ऑर्लीन्समधील हल्ल्याशी संबंध आहे का? याची चौकशी सुरू आहे. 

 

2 Jan 2025, 10:21 वाजता

कल्याण प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आज कोर्टात होणार हजर

उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आरोपी विशाल गवळी हा पोलीस कोठडीत आहे. तर आज त्याची पोलीस कोठडी संपत असून त्याला पुन्हा एकदा आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. या वेळी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी विशाल गवळीनं तिची गळा दाबून हत्या केल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात पोलिसाना निष्पन्न झाले आहे. तर पोलिस तपासाकरिता विशालला बुलढाणा जिल्ह्यातील शेगावला नेण्यात आले होते. पोलीस आज मिळालेले काही पुरावे न्यायालयात सादर करणार असून तपासासाठी पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी करणार असल्याची कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांची माहिती. 

2 Jan 2025, 10:20 वाजता

संतोष देशमुख हत्येप्रकरणी CID तपासानंतर आता एसआयटी गठीत

बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली पथकातील 10 पोलीस अधिकारी लावणार हत्येचा छडा.

 

2 Jan 2025, 10:19 वाजता

जम्मू काश्मीरच्या डोंगराळ भागात बर्फवृष्टीचा कहर.. 

काश्मीरमधल्या अनेक भागात पारा तापमान उणे अंश सेल्सिअस खाली. मैदानी भागात शीत लहरींनी नागरिकांचे हाल.