22 Aug 2024, 22:28 वाजता
गोकुळाष्टमी, दहीहंडीसाठी नवी नियमावली जारी
Guidlines for Dahihandi festival : गोकुळाष्टमी आणि दहीहंडीच्या सणासाठी मुंबई पोलिसांनी नवी नियमावली जारी केलीय.. येत्या सोमवारी 26 ऑगस्टला गोकुळाष्टमी, तर 27 ऑगस्टला दहीहंडी उत्सव साजरा केला जाणाराय. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी ही नियमावली जाहीर केली... त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी वाजवण्यास बंदी घालण्यात आलीय. पादचा-यांवर रंगीत पाण्याचे फुगे मारण्यास मनाई करण्यात आलीय... या नियमांचं उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
22 Aug 2024, 20:42 वाजता
समरजित घाटगेंनी सोशल मीडियावरुन कमळ चिन्ह हटवलं
Samarjit Ghatge : भाजप नेते समरजीत घाटगेंनी आपल्या सोशल मीडियावरुन कमळ चिन्ह हटवलंय... समरजीत घाटगेंच्या सोशल मीडियावर वारसा शाहूंचा, लढा सर्वसामान्यांचा असा नवा फोटो लावण्यात आला आहे.. महायुतीच्या कोल्हापूरमधल्या मेळाव्यनंतर काही तासांमध्येच समरजीत घाटगेंनी आपल्या सोशल मीडियावरुन कमळ चिन्ह हटवलं आहे.. त्यामुळे समरजीत घाटगेंनी भाजपपासून फारकत घेतली का याची चर्चा आता सुरु झाली आहे.. समरजीत घाटगेंनी उद्या कार्यकर्त्यांचाही मेळावा बोलावला आहे.. त्यामुळे समरजीत घाटगे उद्या मोठी घोषणा करणार का याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
22 Aug 2024, 20:13 वाजता
मार्ड डॉक्टरांचा संप अखेर मागे
MARD Doctor Strike : मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मार्डच्या डॉक्टरांनी संप मागे घेतलाय...डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी स्थानिक पोलीस आणि स्थानिक डॉक्टरांमध्ये सुरक्षेसंदर्भात समन्वय साधणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती मिळतेय...त्याचबरोबर मार्ड डॉक्टरांच्या विविध मागण्या मान्य करण्यात आल्याचंही मुख्यमंत्री म्हणालेत...वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मार्डच्या डॉक्टरांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली
बातमीचा व्हिडीओ पाहा-
22 Aug 2024, 19:31 वाजता
चंद्रपुरात मनसेच्या 2 गटात हाणामारी
Chandrapur MNS Rada : चंद्रपुरात मनसेच्या दोन गटात हाणामारी...राजुरा विधानसभा मतदारसंघात सचिन भोयर याच्या उमेदवारी ला विरोध करत भोयर समर्थक आणि दुसरे इच्छुक चंद्रप्रकाश बोरकर समर्थकांमध्ये हाणामारी
बातमीचा व्हिडीओ पाहा-
22 Aug 2024, 19:08 वाजता
कोल्हापुरात 10 वर्षे चिमुकलीवर अत्याचार करून हत्या
Kolhapur Sexual Abuse : आता एक धक्कादायक बातमी कोल्हापूर शहराजवळील शिरोली मधून. दहा वर्षे चिमुकलीवर अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बदलापूरची घटना ताजी असतानाच कोल्हापुरातील ही घटना समोर आल्याने खळबळ माजली आहे. कोल्हापूरच्या शिये गावातील राम नगर परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सबंधित मुलगी काल दुपार पासून बेपत्ता होती, या प्रकरणी एका. संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शिवानी कुमार अस 10 वर्षीय मुलाचे नाव असून CCTV मध्ये ही लहान मुलगी एका व्यक्ती सोबत घटनास्थळी जात असताना दिसून आली आहे.
22 Aug 2024, 18:22 वाजता
दक्षिण नागपूर जागेवरून मविआत रस्सीखेच
Nagpur south seat MVA : दक्षिण नागपूर विधानसभेच्या जागेवरून मविआत रस्सीखेच सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी संजय राऊतांनी दक्षिण नागपूरच्या जागेवर दावा केलाय... त्यांच्या दाव्यानंतर आता काँग्रेस आक्रमक झालीय.. नागपूरची जागा काँग्रेसची असल्याचा दावा काँग्रेसच्या विकास ठाकरेंनी केलाय.. त्यामुळे या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
22 Aug 2024, 17:39 वाजता
'सत्ता द्या, राज्य कोरं करकरीत करेन', राज ठाकरेंचं आवाहन
Raj Thackeray : बदलापूर विषय मनसेच्या महिला आघाडीच्या पदाधिका-यांनी लावून धरल्यामुळे उघडकीस आल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय...त्या मनसेच्या महिलांचा अभिमान असल्याचं राज ठाकरे म्हणालेत...राज ठाकरे गोंदिया दौ-यावर आहेत...भाषणावेळी राज ठाकरेंनी मनसे महिला आघाडीचं कौतुक केलंय.. माझ्या हातात सत्ता द्या. मी तुम्हाला ४८ तास मोकळीक देईन, आपण महाराष्ट्र कोरा करकरीत करून घेऊ. असं आवाहन राज ठाकरेंनी केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
22 Aug 2024, 17:06 वाजता
इकबाल चहल यांची गृह विभागात बदली, चहल गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव
Iqbal Chahal Transferred : सनदी अधिकारी इकबाल सिंह चहल यांची गृह विभागात बदली... इकबालसिंह चहल गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव...सुजाता सौनिक यांच्या जागेवर सहल यांची वर्णी...सुजाता सौनिक मुख्य सचिव झाल्याने पद होते रिक्त...मुंबई महापालिकेतील कारभार आणि कोविड काळातील भ्रष्टाचारावरून भाजप नेत्यांनी केले होते चहल यांच्यावर गंभीर आरोप
बातमीचा व्हिडीओ पाहा-
22 Aug 2024, 16:21 वाजता
पृथ्वीराज चव्हाण मनोज जरांगेंच्या भेटीला
Prithviraj Chavan met Manoj Jarang : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल...अंतरवाली सराटी येथे चव्हाण दाखल...पृथ्वीराज चव्हाण यांच्या सोबत माजी खासदार रजनीताई पाटीलही जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल....पृथ्वीराज चव्हाण आणि जरांगे यांच्यात। चर्चा सुरु
22 Aug 2024, 16:04 वाजता
बदलापूर घटनेची मुंबई हायकोर्टाकडून दखल
Badlapur Sexual Abuse Case : बदलापूर पोलिसांच्या भूमिकेरवर मुंबई हायकोर्टानं ताशेरे ओढलेत.. कायद्याचं पालन झालं आहे का असा सवाल कोर्टानं सरकारी वकिलांना विचारलाय..
पोलिसांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आहे का असा सवाल कोर्टानं केलाय... पीडित मुलीची ओळख उघड केल्यानं न्यायालयानं कान उघाडणी केलीय.. पीडीत दुसऱ्या मुलीचा जबाब का नोंदवला नाही याचं उत्तर देण्याचे आदेश कोर्टानं पोलिसांना दिलेत.. दुसऱ्या पीडित मुलीच्या बाबतीत अजून गुन्हा दाखल का केला नाही? असा सवालही पोलिसांना मुंबई हायकोर्टानं विचारलाय.. दरम्यान आजची सुनावणी संपली आहे. पुढील सुनावणी आता मंगळवारी होणार आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा-