8 Dec 2024, 09:04 वाजता
राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर?
State Cabinet Expansion : 11 व 12 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता कमीच-सूत्रांची माहिती..मंत्र्यांच्या नावांची निवड, तीनही नेत्यांच्या नावांवर चर्चा आणि त्यानंतर केंद्रातून मंजुरी या प्रकियेला वेळ लागण्याची शक्यता-सूत्र..विशेष अधिवेशन उद्या पर्यंत चालणारेय, त्यामुळे एका दिवसात ही सर्व प्रकिया होणे कठीण - सूत्र.. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी सांगितल्या प्रमाणे 11, 12 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हं धुसर आहेत - सूत्र
8 Dec 2024, 08:27 वाजता
उद्या माणगावात ईव्हीएम विरोधात राजेंद्र ठाकूरांचं आंदोलन
Rajendra Thakur : विधानसभा निवडणूकीत श्रीवर्धन मतदार संघातील पराभूत अपक्ष उमेदवार राजेंद्र ठाकूर यांनी ईव्हीएम विरोधात दंड थोपटलंय. आपला पराभव हा केवळ ईव्हीएममुळेच झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे उद्या माणगावात ते जनआंदोलन करणारेत.आंदोलनाला कॉंग्रेस, शेकापसह इतर राजकीय पक्षांचा पाठिंबा असून साधारण 2 हजार लोक या आंदोलनात सहभागी होतील, असे राजेंद्र ठाकूर यांनी सांगितलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
8 Dec 2024, 07:43 वाजता
प्रतापगडावरील शिवरायांच्या पुतळ्यावर आज हेलिकॉप्टरमधून होणार पुष्पवृष्टी
साताऱ्यातील प्रतापगडावर आज शासनाकडून शिवप्रताप दिन साजरा केला जाणार आहे. यात हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली जाते.
8 Dec 2024, 07:40 वाजता
मारकडवाडी होणार ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा केंद्रबिंदू
ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा केंद्रबिंदू मारकडवाडी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि जयंत पाटील आज मारकडवाडी दौऱ्यावर आहेत. शरद पवार गटाचे नवनिर्वाचित आमदार उत्तमराव जानकर यांनी ईव्हीएमविरोधात घेतलेल्या भूमिकेबाबत चर्चा करणार आहेत. तसेच मारकडवाडीत राहणाऱ्या गावकऱ्यांशी देखील शरद पवार संवाद साधणार आहेत. आज सकाळी साडेदहा वाजता शरद पवार, जयंत पाटील जाणार माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी गावाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
8 Dec 2024, 07:40 वाजता
उद्या अध्यक्षपदाची निवडणूक; अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख
विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक 9 डिसेंबरला होणार आहे. आज दुपारपर्यंत अर्ज भरता येणार आहे. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी यासंदर्भात विधानसभेत घोषणा केली.
8 Dec 2024, 07:37 वाजता
शरद पवार आज मारकडवाडीला भेट देणार
Sharad Pawar is going to visit Markadwadi today : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आज सोलापुरातील मारकडवाडीचा दौरा करणार आहेत. राष्ट्रवादी SP पक्षाचे नवनिर्वाचित आमदार उत्तमराव जानकर यांनी EVMविरोधात भूमिका घेतली आहे. त्याबाबत मारकडवाडीतील ग्रामस्थांना भेटून, त्यांच्याशी पवार संवाद साधणार आहेत. आज सकाळी साडे दहा वाजता शरद पवार माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावाचा दौरा करणार आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
8 Dec 2024, 07:34 वाजता
शेतकरी आज दिल्लीच्या दिशेने
शेतकरी आज पुन्हा दिल्लीकडे कूच करणार आहेत. एसकेएम नेते पंढेर यांनी शनिवारी ही घोषणा केली. शंभू सीमेवर शेतकरी उभे आहेत. पंढेर शनिवारी बोलताना, उद्या शेतकरी दिल्लीकडे कूच करणार आहेत, सांगितलं. शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. शंभू सीमेवरील शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर यांनी सांगितले की, आपण सरकारच्या निमंत्रणाची वाट पाहत आहोत. सरकारकडून चर्चेचा प्रस्ताव न आल्यास 101 शेतकरी रविवारी दुपारी 12 वाजता शांततेत आंदोलन करतील.
8 Dec 2024, 07:34 वाजता
आज महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक
आज सकाळी मविआच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे. आमदारांची बैठक सकाळी 10 वाजता होणार आहे. मविआच्या आंदोलनाआधी ही बैठक होणार आहे.
8 Dec 2024, 07:32 वाजता
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात चोरांचा सुळसुळाट
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. 4 महिलांसहीत 11 जणांच्या सोन्याच्या चैनींवर चोरांनी डल्ला मारला. तर कार्यकर्त्यांची हजारोंची रोकड घेऊन चोर पसार झाले आहेत. चोरांनी तब्बल 12 लाख रुपयांचे ऐवज लंपास केला.
8 Dec 2024, 07:31 वाजता
मविआ विधानभवन पायऱ्यावर आज आंदोलन करणार
Mahavikas Aghadi : आज मविआ विधानभवन पाय-यावर आंदोलन करणार...विधानभवनात परिसरात ईव्हीएमविरोधात आज आंदोलन...शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन आंदोलन करणार...शपथविधीबाबत मविआ नेते आजचं पुढील निर्णय घेणार
बातमीचा व्हिडीओ पाहा-