20 Dec 2024, 11:46 वाजता
मुंबई हायकोर्टाची राजकीय पक्षांना नोटीस
High Court On Hordings : राज्यातील बेकायदेशीर होर्डिंगप्रकरणी मुंबई हायकोर्टानं राजकीय पक्षांना कारणे नोटीस बजावलीय. लेखी हमी देऊनही त्याचं उल्लंघन केलात. त्यामुळे अवमान कारवाई का करू नये? असा सवाल हायकोर्टानं राजकीय पक्षांना विचारलाय. बेकायदेशीर राजकीय होर्डिंगची संख्या भयावह आहे, अशी खंतही कोर्टानं व्यक्त केलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
20 Dec 2024, 10:31 वाजता
राहुल गांधींवर 7 गुन्हे दाखल
Delhi Rahul Gandhi : संसद परिसरात काल धक्काबुक्की झाल्याप्रकरणी राहुल गांधींवर 7 गुन्हे दाखल करण्यात आलेत. हत्येचा प्रयत्न करणे धमकी देणे यासारखे कलम लावण्यात आलेत. दरम्यान राहुल गांधींच्यावर लावलेल्या कलमांविरोधात काँग्रेस आक्रमक झालीय. आज देशभारत निदर्शनं केली जाणारेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
20 Dec 2024, 09:41 वाजता
आवक घटल्यानं फळभाज्या महागल्या
Vegetable Price Hike : बाजारात फळभाज्या महागल्यात.. आवक घटल्यानं फळभाज्यांच्या किंमती वाढल्यात... काकडीचे दर दुपटीनं वाढलेत.. तर शेवग्यांच्या शेंगांची180रुपये किलो दरानं विक्री होतीये..एकीकडे फळभाज्या महाग झाल्या असल्या तरी आवक वाढल्यानं पालेभाज्या मात्र स्वस्त झाल्यात..
20 Dec 2024, 09:34 वाजता
रवींद्र वायकरांची खासदारकी कायम राहणार
Ravindra Waikar : मुंबई उत्तर पश्चिमचे शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई हायकोर्टानं मोठा दिलासा दिलाय.. वायकरांच्या खासदारकीला आव्हान देणारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल कीर्तीकर यांची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळलीये... मतमोजणीत फेरफार करून वायकर यांना विजयी घोषित करण्यात आल्याचा कीर्तिकर यांचा आरोप होता. मात्र ही याचिका हायकोर्टानं फेटाळून लावलीये..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
20 Dec 2024, 09:12 वाजता
सोनं आणि चांदीच्या दरात घसरण
Gold & Silver Price : सोनं चांदीच्या दरात घसरण झालीये.. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने व्याज कपात करताच सोने आणि चांदीच्या दरात घसरण झालीयं.... 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 2 हजार रुपयांची घसरण झालीयं... त्यामुळे सोनं 75 हजार तोळ्यावर पोहोचलंय... तर चांदीचा दर प्रति किलो 86 हजारावर गेलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा
20 Dec 2024, 08:58 वाजता
'वन नेशन वन इलेक्शन' JPCसदस्यांची संख्या वाढवली
One Nation One Election : वन नेशन वन इलेक्शन या संबंधीच्या घटना दुरुस्ती विधेयकासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या JPCमधील एकूण सदस्यांची संख्या वाढवण्यात आलीये.. आता या समितीमध्ये लोकसभेचे 27 तर राज्यसभेचे 12 सदस्य असणार आहे.. यापूर्वी समितीमध्ये लोकसभेचे 21 तर राज्यसभेचे 10सदस्यच होते.. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसंच इतर काही पक्षांनी त्यांच्या सदस्यांची नावं नसल्यानं आक्षेप घेतला होता.. त्यामुळे समितीमध्ये सदस्य वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनिल देसाई यांच्या नावाचा जेपीसीमध्ये समावेश करण्यात आलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
20 Dec 2024, 08:01 वाजता
मिरजमधील गणेश तलावात हजारो मासे मृत्युमुखी
Miraj Fish Death : सांगलीच्या मिरजमध्ये गणेश तलावात हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत... त्यामुळे तलावातील काठावर मृत माशांचा खच पडलायं... पाणी दूषित झाल्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केलायं... त्यामुळे तलावात निर्माल्य, कचरा न टाकण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
20 Dec 2024, 08:01 वाजता
मिरजमधील गणेश तलावात हजारो मासे मृत्युमुखी
Miraj Fish Death : सांगलीच्या मिरजमध्ये गणेश तलावात हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत... त्यामुळे तलावातील काठावर मृत माशांचा खच पडलायं... पाणी दूषित झाल्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केलायं... त्यामुळे तलावात निर्माल्य, कचरा न टाकण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
20 Dec 2024, 07:58 वाजता
परभणी, बीडवर मुख्यमंत्री आज उत्तर देणार
Nagpur Devendra Fadanvis : परभणी आणि बीडमधील घटनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत निवेदन देणार आहे. सकाळी 11 वाजता फडणवीस दोन्ही घटनांवर उत्तर देतील. परभणीतील तरुणाचा मृत्यू आणि बीडमधील सरपंचाच्या हत्येमुळे विरोधक कमालीचे आक्रमक झालेत. विधीमंडळात त्यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतलीय. ते आज विधानसभेत या घटनांवर उत्तर देणारेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -