Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on June 19 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

19 Jun 2024, 22:00 वाजता

'मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांचे 12 वाजले', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

 

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन म्हणणा-यांचे बारा वाजले...अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता फडणवीसांवर निशाणा साधला...त्याचबरोबर नडायला निघाले होते, त्यांनी नाडा सांभाळावा अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी जेपी नड्डा यांना इशारा दिलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

19 Jun 2024, 20:59 वाजता

'उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा', उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

 

Uddhav Thackeray on Raj Thackeray : शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचं नाव न घेता खिल्ली उडवलीय.. मला विरोध करण्यासाठी काहींनी उघड म्हणजे बिनशर्ट पाठिंबा दिला.. अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

19 Jun 2024, 18:56 वाजता

इंदापूरमध्ये कारनं मुलाला चिरडलं

 

Indapur Accident : इंदापूरमध्ये सायकल चालवणा-या दहा वर्षाचा मुलाचा कारच्या धडकेत मृत्यू झालाय.. उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली... या अपघाताचा थरार अंगावर काटा आणणारा आहे.. मुलाच्या अंगावरून पुढील आणि मागील चाक गेल्याचं स्पष्ट दिसतंय.. भिगवण पोलीस स्टेशनमध्ये अजूनही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही...

19 Jun 2024, 17:09 वाजता

मनोज जरांगे पुन्हा एकदा राज्यव्यापी दौरा करणार

 

Manoj Jarange : जरांगे पुन्हा एकदा राज्यव्यापी दौरा करणार आहेत.. जरांगेंचा हा राज्यव्यापी दौरा पाच टप्प्यात पार पडेल.. 6 जुलैला हिंगोलीपासून रॅलीला सुरुवात होईल.. पहिल्या टप्प्यात 6 जुलै ते 13 जुलै या दरम्यान जरांगे दौरा करतील... तेव्हा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पुन्हा एकदा राज्य ढवळून काढणार आहेत..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

19 Jun 2024, 16:31 वाजता

'महायुतीत अजित पवारांना बळीचा बकरा करणार',रोहित पवारांचा भाजपवर आरोप

 

Rohit Pawar on Ajit Pawar  : महायुतीत तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजित पवारांना बळीचा बकरा करण्यात येत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय...यासंदर्भात त्यांनी ट्विट केलंय...मविआ विरोधात दुरंगी लढतीत पराभव होतो म्हणून तिरंगी लढतीसाठी भाजपचे प्रयत्न असल्याचंही त्यांनी म्हटलंय...आरएसएसच्या मुखपत्रातून आधी अजित पवारांवर आरोप झाले आणि पुढे काहीतरी करून अजितदादांना वेगळं होण्यास भाग पाडायचं ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीत मांडल्याची चर्चा असल्याचंही रोहित पवार म्हणालेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

19 Jun 2024, 16:09 वाजता

दिल्लीतील भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत नाराजी- सूत्र

 

Delhi BJP Meeting : दिल्लीतील कालच्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सोशल मीडियातील प्रचारासंदर्भात देखील चर्चा झाली...सोशल मीडियात भाजपविरोधात केलेल्या प्रचाराला उत्तर देण्यात राज्यातील नेते कमी पडल्याची चर्चा झाली अशी माहिती सूत्रांनी दिलीय...विरोधकांकडून जे मुद्दे सोशल माध्यमांमध्ये मांडले गेलेत, त्याला उत्तर देण्यात भाजप कमी पडल्याची देखील चर्चा झाल्याची माहिती मिळतेय...येत्या काळात निवडणुका तोंडावर असताना सोशल मीडियातून देखील विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देण्यावर चर्चा झालीय...यामुळे आता भाजपकडून आगामी काळात विरोधकांना प्रत्युत्तर देण्याच्या दृष्टीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर वाढवला जाणार आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

19 Jun 2024, 15:45 वाजता

'राज्य सरकार हातात कसं येत नाही मी बघतो', शरद पवारांचं सूचक वक्तव्य

 

Sharad Pawar : आज केंद्र आणि राज्य सरकार आमच्या हातात नाही. मात्र उद्या निवडणुका येतील, तेव्हा राज्य सरकार कसं हातात येत नाही ते मी बघतो, असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय. बारामतीच्या नीरावागजमध्ये जाहिर सभेत त्यांनी हे विधान केलंय. तसंच राज्य सरकार हातात आलं तर ही दुखणी दुरुस्त करायला वेळ लागणार नाही, असा टोलाही त्यांनी सत्ताधा-यांना लगावलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

19 Jun 2024, 15:18 वाजता

'नारायण राणे भ्रष्ट मार्गाने जिंकले', ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

 

Uddhav Thackeray Group on Narayan Rane : नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आले....शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा आरोप...कारवाई करण्याबाबत निवडणूक आयोगाकडे वकीलामार्फत शिवसेना उद्धव ठाकरे गटाची तक्रार 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

19 Jun 2024, 13:19 वाजता

बारामतीकर वहिवाट विसरले नाहीत - शरद पवार

 

Baramati Sharad Pawar : यावेळेला बारामतीकर आपली वहिवाट विसरले नाहीत. बारामतीकर घ्यायचा तो निकाल घेतात, असा टोला शरद पवारांनी अजित पवारांना लगावलाय. बारामतीच्या दौ-यावर असताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलंय. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचा पराभव केल्यानंतर शरद पवारांनी अजित पवारांवर ही खोचक टीका केलीय. दरम्यान तुमच्या मतदारसंघाचे नाव नवीन खासदार गाजवल्याशिवाय राहणार नाहीत, तुम्हाला त्याच समाधान मिळेल, असंही पवारांनी सांगितलं. तर पवारांच्या बारामती दौ-यामुळे विधानसभेला आमच्या यशावर काही परिणाम होईल असं वाटत नसल्याचं सुनील तटकरेंनी म्हटलंय

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

19 Jun 2024, 12:54 वाजता

भुजबळांना शिवसेनेत घेणार नाही - संजय राऊत

 

Sanjay Raut On Chagan Bhujbal : भुजबळांबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केलीय... भुजबळांशी शिवसेनेचा कोणताही राजकीय संवाद झालेला नाही...भुजबळांनी वेगळी भूमिका स्वीकारली असून, त्यांच्या भूमिकेशी शिवसेनेची भूमिका मेळ खात नाही...त्यामुळे भुजबळांना शिवसेनेत घेणार नसल्याचं राऊतांनी स्पष्ट केलंय...भुजबळांना ठाकरे गटाचा कोणताही नेता भेटला नसून, त्यांच्याची कोणतीही चर्चा झाली नाहीये...तसंच भुजबळ शिवसेनेत राहिले असते तर मुख्यमंत्री झाले असतं असं राऊतांनी म्हटलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा -