Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 12 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

12 Oct 2024, 12:36 वाजता

महाराष्ट्रातील सोन्याची लूट झाली- राज ठाकरे

 

Raj Thackeray : महाराष्ट्रातील सोनं गेल्या अनेक वर्षापासून लूटलं गेलं. आपल्या हातात केवळ आपट्याची पानं राहिली, अशा शब्दांत राज ठाकरेंनी राजकीय नेते मंडळीवर निशाणा साधलाय. केवळ रस्ते म्हणजे प्रगती का? असा सवालही राज यांनी विचारलाय. तर खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंना उत्तर दिलंय. राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत लूटणा-यांच्या पाठिशी उभे राहिले. मोदी आणि शाह यांनी राज्याची लूट केली आणि राज यांनी या लुटीला समर्थन दिलं, असा आरोपही संजय राऊतांनी केलाय. 

12 Oct 2024, 12:13 वाजता

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं महागलं

 

Gold Hike :  विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर सोने महागले...सोन्याच्या दरात तब्बल ३०० रुपयांनी वाढ...सोन्याचे भाव ७८ हजार ५०० रुपये प्रति तोळा...गेल्या वर्षाच्या तुलनेत सोन्याच्या दरात प्रती तोळा तब्बल १६ हजार रुपयांची वाढ...सोने खरेदीसाठी दसऱ्याचा मुहूर्त हा शुभ मानला जातो 

12 Oct 2024, 11:16 वाजता

मविआची उद्या संयुक्त पत्रकार परिषद

 

Tomorrow Mahavikas Aghadi Press Conference : मविआची उद्या संयुक्त पत्रकार परिषद...शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंची पत्रकार परिषद...विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद...उद्या मविआचं जागावाटप जाहिर होणार का याकडे लक्ष

12 Oct 2024, 10:09 वाजता

'आज पिपाण्या वाजणार नाहीत', संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना चिमटा

 

Sanjay Raut on Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आजचा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा ऐतिहासिक होणारेय. आजच निवडणुकीचं रणशिंगं आज फुंकलं जाणारेय, अशी माहिती खासदार संजय राऊतांनी दिलीय. तर पिपाण्या वाजणार नाहीत, अशा शब्दांत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना चिमटा काढलाय.

12 Oct 2024, 09:37 वाजता

आगामी विधानसभा निवडणुकीत क्रांती झाली पाहिजे- राज ठाकरे

 

Raj Thackeray : आगामी विधानसभा निवडणुकीत क्रांती झाली पाहिजे, असं आवाहन राज ठाकरेंनी राज्यातील नागरिकांना केलंय. दस-यानिमित्त पॉडकास्टच्या माध्यमातून राज ठाकरेंनी नागरिकांशी संवाद साधलाय. यावेळी त्यांनी नागरिकांना बदल घडवण्याचं आवाहन केलंय. मतदारांना जागं होण्याची वेळ आलीय. बदल घडवण्यासाठी शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्र बाहेर काढा, असं राज ठाकरे म्हणाले.

12 Oct 2024, 08:40 वाजता

 तामिळनाडूत दरभंगा एक्स्प्रेसचा अपघात

 

Tamilnadu Train Accident : तामिळनाडूत दरभंगा एक्स्प्रेसचा अपघात झालाय.. थिरुवल्लूर जिल्ह्यातील कावरपेट्टई रेल्वे स्थानकावर दरभंगा एक्सप्रेसनं मालगाडीला धडक दिलीये..या दुर्घटनेत दरभंगा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले. तसंच मालगाडीला आग लागली.. धडक झालेली मालगाडी लूप लाइनमध्ये उभी होती. तर दरभंगा एक्स्प्रेसही त्याच रुळावरून धावत होती. अपघात झाला तेव्हा दरभंगा एक्स्प्रेस 75 किलोमीटर प्रतितास वेगानं धावत होती... ही रेल्वे म्हैसूरहून दरभंगाला जात होती. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.. मात्र अनके प्रवासी जखमी झालेत.. सर्व प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय... सध्या दुर्घटनाग्रस्त एक्स्प्रेस आणि मालगाडीचे डबे हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे.  

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

12 Oct 2024, 08:10 वाजता

भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा

 

Pankaja Munde : पंकजा मुंडेंचा आज सावरगावमध्ये दसरा मेळावा... बीडच्या भगवान भक्तीगडावर मेळाव्याचं आयोजन... धनंजय मुंडे मेळाव्याला उपस्थित राहणार... पंकजा आजच्या सभेतून ओबीसींना साद घालण्याची शक्यता 

12 Oct 2024, 07:45 वाजता

दसऱ्याला पहिल्यांदाच राज ठाकरेंचा संवाद

 

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणारेत. पॉडकास्टच्या माध्यमातून राज ठाकरे जनतेशी संवाद साधणारेत. पहिल्यांदाच राज ठाकरे दसऱ्याच्या दिवशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सा-यांचं लक्ष असणारे..  

12 Oct 2024, 07:41 वाजता

नारायण गडावर आज मनोज जरांगेंचा दसरा मेळावा

 

Manoj Jarange : मनोज जरांगे आज बीडच्या नारायण गडावर दसरा मेळावा घेणार आहेत. हजारोंच्या संख्येनं शेकडो वाहनांसहित पुन्हा एकदा मराठा समाज नारायणगडावर गोळा होणार आहे. एकट्या जालण्यातून दीड हजारावर गाड्या जातील तर संभाजीनगरातून हजारावर गाड्या जातील असा आयोजकांचा दावा आहे. नारायण गडावर जरांगे लढण्याची घोषणा करणार की पाडण्याची घोषणा करणार याकडं मराठा समाजासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.