Breaking News LIVE UPDATES : 'हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' राहुल गांधी यांना म्हणायला सांगा, मोदींचा ठाकरेंवर हल्लाबोल

Breaking News LIVE UPDATES : राज्याच्या राजकारणापासून समाजकारणापर्यंत, कोणत्या क्षेत्रात नेमकं काय सुरुय? पाहा सर्व महत्त्वाच्या अपडेट एका क्लिकवर   

Breaking News LIVE UPDATES : 'हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' राहुल गांधी यांना म्हणायला सांगा, मोदींचा ठाकरेंवर हल्लाबोल

Breaking News LIVE UPDATES : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर महाराष्ट्रात केंद्रीय चेहऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळत असून, खुद्द पंतप्रधान मोदी मुंबई आणि नवी मुंबईत सभा घेणार आहेत. आजचा दिवस सभांचा आणि नेमका आणखी कोणत्या घडामोडींचा असेल? पाहा Live Updates... 

 

14 Nov 2024, 20:45 वाजता

'एक है तो सेफ है', मोदींकडून पुनरुच्चार

मुंबईला तोडण्याची महाविकास आघाडीची भाषा तर मुंबईला जोडण्याची महायुतीची भाषा आहे. काँग्रेस मुंबईला कधी पुढे घेऊन जाऊ शकत नाही. महाविकास आघाडी जातीच्या नावावर लोकांना लढवत आहेत. काँग्रेस काळात मुंबईच्या विकासासाठी कोणतच काम झालं नाही. काँग्रेसनं अटल सेतूचा मेट्रोचा विरोध केला होता. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हाती रिमोट दिला. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असं राहुल गांधी यांना म्हणायला सांगा. असं म्हणत प्रंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

14 Nov 2024, 20:10 वाजता

नरेंद्र मोदींमुळे महाराष्ट्र एक नंबरवर : एकनाथ शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला एक नंबरवर आणलं आहे. मोदींनी राज्याच्या विकासासाठी भरघोस निधी दिला आहे. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. 

14 Nov 2024, 20:05 वाजता

नरेंद्र मोदींमुळे मुंबईचा चेहरा बदलला : देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मुंबईचा चेहरा बदलला आहे. 22 किलोमीटरचा अटल शेतू महामार्गामुळे मुंबई आणि नवी मुंबई जोडली गेली आहे. मोदींनी मुंबईमध्ये अनेक विकासकामे केली आहेत. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

14 Nov 2024, 19:34 वाजता

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये राडा

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार उन्मेष पाटील यांचे कार्यकर्ते आणि महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. गावातून प्रचार सुरू असताना उमेश पाटील यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते आणि मंगेश चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची.

14 Nov 2024, 18:58 वाजता

17 नोव्हेंबरच्या शिवाजी पार्कवरील सभेचा सस्पेन्स कायम, मनसेला अद्यापही परवानगीची प्रतीक्षा

17 नोव्हेंबरच्या सभेला मनसेला शिवाजी पार्कवर मिळणारी परवानगी लांबणीवर, शासन स्तरावर निर्णय अद्यापही प्रलंबित.नगर विकास विभागाचा शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यासाठी मनसेला अद्याप हिरवा कंदील नाही. 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यासाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटांनी  केला होता अर्ज.

14 Nov 2024, 17:13 वाजता

रश्मि शुक्ला प्रकरणी काँग्रेसची उच्च न्यायालयात धाव

कॉंग्रेस पक्षाच्यावतीने रश्मि शुक्ला यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. रश्मि शुक्ला यांना पुन्हा सेवेत घेतलं जाऊ नये म्हणून कॉंग्रेसने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सध्या रश्मि शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.

14 Nov 2024, 15:55 वाजता

महायुतीत जाण्यावरुन नाशिकमध्ये दादांचा मोठा गौप्यस्फोट

शिंदेंसोबतच महायुतीमध्ये जाणार होतो. आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या आमदारांनी ठरवलं होतं. महायुतीत जाण्यावरुन नाशिकमध्ये दादांचा मोठा गौप्यस्फोट.

14 Nov 2024, 14:47 वाजता

सांगलीतील बेडगमध्ये पंकजा मुंडे यांच्या  बॅगची तपासणी

भाजपाच्या स्टार प्रचारक पंकजा मुंडे यांच्या  बॅगची तपासणी करण्यात आली. सांगलीतील बेडगमध्ये पंकजा मुंडे हेलिकॉप्टरमधून दाखल होताच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगची तपासणी केली.  सुरेश खाडे यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे सांगलीमध्ये आल्या होत्या.

14 Nov 2024, 14:10 वाजता

सरकार आल्यावर लाडक्या बहिणींना 3 हजार देणार : नाना पटोले

बंडखोरांचा प्रचार करणाऱ्यांवर कारवाई करू असं सूचक विधान नाना पटोलेंनी केलं आहे. नागपुरात काँग्रेसचे काही नेते बंडखोरांचा प्रचार करताहेत त्यावरून नाना पटोलेंनी त्यांना हा इशारा दिलाय. लाडक्या बहिणींना मविआचं सरकार आल्यावर 3 हजार देणार असल्याचंही नाना पटोले म्हणाले. यावेळी पटोलेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. तसेच विदर्भात मविआचा स्ट्राईक रेट 90 टक्के असणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

14 Nov 2024, 13:11 वाजता

संविधानाचा अपमान म्हणजे राष्ट्रपुरुषांचा अपमान... राहुल गांधींकडून सत्ताधाऱ्यांचा समाचार  

नंदुरबार येथील जाहीर सभेदरम्यान काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हाती संविधान घेत उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणाही साधला. 'संविधान रिकामे नाही, यात बिरसा मुंडा, बुद्धाचा विचार, आंबेडकरांचे आणि गांधींचे विचार आहेत. या संविधानात देशाची आत्मा आहे, जेव्हा मोदी संविधानाचा अपमान करतात तेव्हा राष्ट्र पुरुषांचा अपमान केला जातो', असं ते म्हणाले. संविधानात मागास समाजाला आदिवासी संबोधिले जाते, पण भाजप- मोदी आपल्याला वनवासी म्हणतात. आदिवासी आणि वनवासी यात फरक आहे, आदिवासी म्हणजे देशाचे पहिले मालक, पहिले नागरिक आहेत, या शब्दांत त्यांनी भाजपच्या भूमिकेवर सडकून टीका केली.