Gudi Padwa 2023 : नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा, उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरा करूया हा गुढीपाडवा… नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रत्येकजण आनंदाची ,सुखसमृद्धी, आणि भरभराटीची गुढीही उभारतायत.तर कुणी पारंपरिक पोषाखात शोभायात्रांमध्ये सहभागी होतायत. राज्यातील हा उत्साह साजरा करा झी 24 ताससोबत
22 Mar 2023, 11:43 वाजता
Gudi Padwa in Maharashtra : पंढरपुरात गुढीपाडव्याच्यानिमित्तानं विठ्ठल-रुक्मिणी मंदिरावर ध्वज फडकवला गेला... यावेळी विधिवत पूजन करून हा ध्वज फडकवला गेला.... वर्षभरात गुढी पाडवा आणि दिवाळी पाडवा या मुहूर्तावर हा ध्वज बदलण्याची परंपरा आहे....
22 Mar 2023, 11:43 वाजता
Gudi Padwa in Maharashtra : साडेतीन मुहूर्त पैकी एक आणि नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा... यानिमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सुंदर आरास केलीय. संपूर्ण मंदिर फुलांमध्ये सजलंय. 450 किलो शेवंती, गुलाबी कण्हेर, अष्टर, झेंडू आणि गुलाब फुले वापरून ही फुलांची आरास केलीय.
22 Mar 2023, 11:42 वाजता
Gudi Padwa in Maharashtra : अकोल्यात नववर्षाचं जोरदार स्वागत करण्यात आलं.... यानिमित्तानं संस्कृती संवर्धन समितीच्यावतीनं महारॅलीचं आयोजन करण्यात आलं.... यावेळी पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेतील महिला-पुरूषांनी शहरातील मुख्य मार्गावरून मोटार-सायकल रॅली काढली....
22 Mar 2023, 11:42 वाजता
Gudi Padwa in Maharashtra : आज चैत्रशुद्ध पाडव्याला जेजुरी कडेपठारावर खंडेरायाच्या गाभा-यात किरणोत्सव साजरा झाला.सकाळी सूर्यकिरण गर्भगृहामध्ये दाखल झाल्याबरोबर भाविकांनी पुजारी मंडळींनी सदानंदाचा येळकोट असा एकच जल्लोष केला. आजच्या मुहूर्तावर सूर्यकिरणे सरळ रेषेत येऊन महाराजांच्या अंगावर अभिषेक झाला.
22 Mar 2023, 11:41 वाजता
Gudi Padwa in Maharashtra : कल्याणमध्ये गेल्या 16 वर्षापासून भव्य स्वागत यात्रेची परंपरा आहे. या शोभायात्रेत महिला फेटे परिधान करुन बाईक रॅलीत सहभागी झाल्या होत्या. तर बच्चेकंपनी वारकरी, छत्रपती शिवाजी महाराज,राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशभूषा करून स्वागत यात्रेत सामील झाले. तर आदिवासीं बांधवांनीही पारंपरीक वेशभुषेसह नृत्य केलं.
22 Mar 2023, 11:41 वाजता
Gudi Padwa in Maharashtra : कोल्हापुरातील ऐतिहासिक भवानी मंडपाला गुडी पाडव्यानिमित्त साखरेच्या माळेचं तोरण बांधण्यात आलं. गेल्या चार पिढ्यांपासून भवानी मंडपाला माळकर कुटुंबीयांकडून तोरण बांधण्याची परंपरा सुरू आहे. कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन छत्रपती राजाराम महाराजांना कन्यारत्न झालं, तेव्हा आनंदोत्सव म्हणून कोल्हापूरातील रामचंद्र माळकर यांनी विशिष्ट साच्यातील साखरेची माळ बनविली.
22 Mar 2023, 11:41 वाजता
Gudi Padwa in Maharashtra : परंपरेला फाटा देत कोल्हापूर जिल्ह्यातील येळाणे इथल्या डॉ. संजय जगताप आणि परिवाराने पुस्तकांची गुढी उभारून एक नवा आदर्श समाजासमोर उभा केला आहे. पुस्तकांच्या गुढीचे हे पाचवे वर्ष आहे. जगताप परिवाराने आपल्या धार्मिक सणाचे औचित्य साधून वाचन संस्कृती जपण्यासाठी केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
22 Mar 2023, 11:40 वाजता
Gudi Padwa in Maharashtra : कल्याणमध्येही गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळला.... यावेळी कल्याण सांस्कृतिक मंच रोटरीक्लबच्यावतीनं महिलांची बाईक रॅली काढण्यात आली....
22 Mar 2023, 11:38 वाजता
Gudi Padwa in Maharashtra : गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला संभाजीनगरमध्ये महिलांनी भगवे फेटे घालून बाईक रॅली काढली. कुलस्वामिनी प्रतिष्ठाननं ही बाईक रॅली आयोजित केली होती. यावेळी 9 रंगाच्या 9 गुढी उभारून महिला सबलीकरणाचा संदेश देण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत अनेक महिलांनी या रॅलीत सहभाग घेतला.
22 Mar 2023, 11:38 वाजता
Gudi Padwa in Maharashtra : गुढीपाडव्यासाठी गुढी उभारायला लागणारे बांबू आणि झेंडूच्या फुलांची बाजारात मोठी आवक झालीय. रायगड जिल्ह्यात गुढीसाठी लागणारा बांबू ५० ते ८० रुपयांना विकला जातोय. तसंच अवकाळी पावसामुळे झेंडूच्या फुलांचे दरही वधारलेत. एरवी शंभर रुपये किलो दराने मिळणारा झेंडू आता दीडशे रुपयांवर पोहोचलाय.