Breaking News LIVE : राज्याच्या राजकारणाला दर दिवशी नवं वळण मिळत असतानाच या परिस्थितीमध्ये विधानसभेचं पावसाळी अधिवेशन गुरुवार, 27 जून 2024 पासून सुरू होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वीचं हे शेवटचं अधिवेशन असल्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्य म्हणजे एकाच कार्यकाळात तीन मुख्यमंत्री पाहिललेल्या या विधानसभेच्या अधिवेशनाची या सततच्या बदलांमुळंही बरीच चर्चा.
या अधिवेशनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निर्णय घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल तर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करतील हे स्पष्ट आहे. याव्यतिरिक्तही राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाच्या अंदाजापासून ते अगदी इतर सर्व घडामोडींपर्यंतच्या सर्व अपडेट एका क्लिकवर पाहा Breaking News LIVE....
27 Jun 2024, 19:19 वाजता
- विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार?
- लोकसभेत पराभव झाल्यानंतर मुंडे याचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या तयारीत भाजप..
- 11 जागांसाठी विधानपरिषदेच्या निवडणुका होणार आहे. त्यात भाजप आपले पाच उमेदवार रिंगणात उतवण्याच्या तयारीत आहे
- OBC आरक्षण आणि पंकजा मुंडे यांचं लोकसभेत झालेलं पराभव या गोष्टी लक्षात घेऊन मुंडे यांना विधानपरिषदेवर उमेदवारी दिली जाऊ शकते...
- आगामी विधानसभा निवडणुकीत डोळ्यासमोर ठेऊन भाजप पंकजा मुंडे यांना देणार संधी - सूत्रांची माहिती
27 Jun 2024, 16:02 वाजता
अहमदनगरचे महापालिका आयुक्त फरार...
छत्रपती संभाजीनगर एसीबीची अहमदनगरमध्ये कारवाई...
अहमदनगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्या दालनाची एसीबी पथकाकडून झाडाझडती...
एसीबीच्या कारवाईबाबत पाळण्यात येत आहे कमालीची गुप्तता...
मनपा आयुक्तांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्याही घरी झाडाझडती सुरू...
सकाळी सात वाजल्यापासून अहमदनगरमध्ये एसीबीकडून करावाई सुरू...
मनपा आयुक्तांचे शासकीय घराला देखील मारले टाळे...
27 Jun 2024, 15:01 वाजता
विधानभवनात फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची लिफ्टमध्ये भेट झाली. याभेटीनंतर फडणवीस उद्धव ठाकरेंना एका ताटात जरी घेऊन जेवले तरी आम्ही आता फडणवीस या नावावर फुली मारलीय. अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली. तसेच त्यांनी एका लिफ्टमधून प्रवास केला हा फक्त योगायोग होता. यावरून ते एकत्र आले असा अर्थ होत नाही, असही त्या म्हणाल्या.
27 Jun 2024, 14:53 वाजता
सेन्सेक्सचा नवा रेकॉर्ड...पहिल्यांदाच 79 हजाराच्या टप्प्यापार...बँकिंग, टेलिकॉम क्षेत्राची दमदार कामगिरी...तर, निफ्टी 24 हजारावर
27 Jun 2024, 13:08 वाजता
उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद
जनता खोके सरकारला बाय बाय करणार - उद्धव ठाकरे
घोषणा किती आणि पूर्तता किती ते सांगावं - उद्धव ठाकरे
प्रश्न विचारले की आमच्यावर आरोप करतात - उद्धव ठाकरे
27 Jun 2024, 12:32 वाजता
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच हे पावसाळी अधिवेशन सुरु होत असल्याने वादळी होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वीचं हे शेवटचं अधिवेशन असेल. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन खडाजंगी होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आले होते. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी एकाच लिफ्टने प्रवास केला.
27 Jun 2024, 12:25 वाजता
Breaking News LIVE : दुधाला किमान 35 रुपये दर देण्याच्या मागणीसाठी आंदोलन
दूध दरासाठी पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.. दुधाला किमान 35 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर दुध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत. दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 28 जून पासून राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार आहे.. दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली असून अधिवेशन काळात सरकारच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.
27 Jun 2024, 11:52 वाजता
Breaking News LIVE : चंद्रकांत पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट?
संसदीय कामकाज मंत्री या नात्याने चंद्रकांत पाटील हे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना पुष्पगुच्छ देण्यासाठी आले तेव्हा तिथे उद्धव ठाकरेही होते. यावेळी एकमेकांना बऱ्याच कोपरखळ्या मारल्या. यावेळी सर्वांच्याच नजरा वळल्याचं पाहायला मिळालं. यावेळी अनिल परब यांचं अॅडव्हान्समध्ये अभिनंदन करण्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं.
27 Jun 2024, 11:29 वाजता
Breaking News LIVE : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचं कामकाज पूर्ण
विरोधकांचा गोंधळ, पायऱ्यांवरील घोषणाबाजी आणि त्यानंतरचा शोकप्रस्ताव अशा कार्यक्रमानंतर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पूर्ण झाला.
27 Jun 2024, 11:12 वाजता
Breaking News LIVE : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधात आक्रमक असल्याचं पाहायला मिळालं. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी महाविकास आघाडीचे विधान भवन पायऱ्यांवर आंदोलन केलं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या समोर विरोधकांची आक्रमक घोषणाबाजी. 'शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची वीजबिल माफ करावी, कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात बळीराजाचा बळी', अशा घोषणा यावेळी विरोधकांनी केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी. शेतकऱ्यांना कर्जमाफी, बिल मुक्ती मिळालीच पाहिजे अशा स्वरूपाच्या जोरदार घोषणाबाजी.