Maharashtra Breaking News Today LIVE Updates : मुख्यमंत्र्यांचे सचिवपदी श्रीकर परदेशी यांची निवड

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : मुख्यमंत्र्यांचे सचिवपदी श्रीकर परदेशी यांची निवड

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : मुख्यमंत्र्यांचे सचिवपदी श्रीकर परदेशी यांची निवड

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : आज 6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो भीम अनुयायी चैत्यभूमीवर आलेत. दादरमधील चैत्यभूमीवर भीम अनुयायांनी गर्दी केलीय. तर काल देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रालयात जाऊन नव्या सरकारची पहिली कॅबिनेट बैठक घेतली. तर आज महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी चैत्यभूमीवर हजेरी लावली. 

6 Dec 2024, 22:35 वाजता

 मुख्यमंत्र्यांचे सचिवपदी श्रीकर परदेशीची निवड झाली आहे. श्रीकर परदेशी मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून  काम पाहणार आहेत. 

6 Dec 2024, 20:48 वाजता

7, 8, 9 डिसेंबरला विधीमंडळाचे विशेष अधिवेशन होणार आहे. यावेळी सर्व आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे. 

6 Dec 2024, 20:05 वाजता

मधुकर पिचड यांना देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून सुरुवात करत प्रदीर्घ काळ त्यांनी राज्य विधिमंडळात प्रतिनिधीत्त्व केले. विरोधी पक्षनेते, मंत्री अशा विविध जबाबदार्‍या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. समाजात वावरत असताना अगणित लोकांचे आयुष्य त्यांच्यामुळे उजळले. जीव ओतून काम करताना त्यांनी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभे केले होते.
आदिवासींच्या प्रश्नांसाठी सातत्याने ते आग्रही असायचे. आर्थिक मागासांसाठी त्यांनी शिक्षणाच्या मोठ्या सुविधा उभारल्या. आदिवासींमध्ये उच्चशिक्षणाची पायाभरणी त्यांनी केली. अकोले तालुक्यात जलसिंचनासाठी त्यांनी केलेले काम मोठे होते. सहकाराच्या क्षेत्रातही त्यांनी छाप उमटवली. त्यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकियांच्या दु:खात मी सहभागी आहे.

6 Dec 2024, 18:44 वाजता

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं निधन झाले आहे. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन हॅमरेजमुळं नाशिकच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. दीड महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार केले जात होते. 
 

6 Dec 2024, 17:38 वाजता

वर्षावरील मुख्यमंत्रिपदाची पाटी झाकण्यात आली आहे. प्रोटोकॉलनुसार पाटी झाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अजूनही वर्षावर एकनाथ शिंदेंचं वास्तव्य आहे. त्यामुळे त्यांचं नाव तसंच ठेवण्यात आलं आहे. मात्र, नाव वगळून केवळ मुख्यमंत्री ही पाटी झाकण्यात आली आहे. 

6 Dec 2024, 16:22 वाजता

ईव्हीएम संदर्भात गैरसमज पसरवणाऱ्या लोकांवर आणि त्यांच्या पक्षांवर कायदेशीर कारवाई करावी अशा मागणी सांगलीच्या भाजपा कडून करण्यात आली आहे.याबाबतचं निवेदन देखील भाजपाच्या सांस्कृतिक आघाडीच्यावतीने मिरजेच्या प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. न्यायालयाने देखील ईव्हीएम बाबत स्पष्ट भूमिका जाहीर केलेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम निर्दोष असल्याचे स्पष्ट करून देखील जाणीवपूर्वक ईव्हीएम बाबत जनतेमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. हे भारतीय कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यामुळे अशा व्यक्ती आणि संबंधित पक्षांच्या वर त्वरित कारवाई करावी,अशी मागणी या निवेदनाद्वारे भाजपाचे सांस्कृतिक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष ओंकार शुक्लांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.

6 Dec 2024, 15:48 वाजता

पतंग उत्सवासाठी येवला शहर राज्यांमध्ये प्रसिद्ध असून गेल्या काही दिवसांपासून पतंग उडवण्यासाठी पतंग शौकिनांकडून नायलॉन मांजा चा सर्रास वापर केला जातो. या नायलॉन मांजा मुळे माणसांसह पशुपक्ष्यांची देखील हानी होत असते. 
सदरचा मांजा वर सरकारकडून बंदी घालण्यात आली असून या मांजा चा वापर व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी येवल्यात शांतता कमिटीच्या बैठकीत बोलताना दिला आहे. 

6 Dec 2024, 15:17 वाजता

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षातील विधानसभेच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवाराची बैठक देवगिरी बंगल्यावर पार पडली. या बैठकीला यशवंत माने,देवेंद्र भुयार,बाळासाहेब आजबे,सुनील टिंगरे,अतुल बेनके आणि राजेश पाटील हे उपस्थित होते. या बैठकीत पराभवाच्या संदर्भात चर्चा झाली आहे आणि त्याचसोबत पराभूत उमेदवारांकडून मित्रपक्षाच्या मदतीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला आणि भाजपच्या भूमकेच्या बाबतीत नाराजी व्यक्त करण्यात आली. अजित पवार यांनी सर्व पराभूत उमेदवार यांना पाठीशी असल्याचं सांगितल आणि पूर्ण ताकदीनीशी काम करा असे आदेश दिले आहेत. पुढच्या निवडणुकीत कसा जिंकून येणार यासंदर्भात काम करा अशा सूचना दिल्या आहेत. 

6 Dec 2024, 14:18 वाजता

शेतकऱ्यांना शंभू बॉर्डरवर रोखलं

आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना शंभू बॉर्डरवर रोखण्यात आलं आहे. हे शेतकरी दिल्लीच्या दिशेने येत होते.

6 Dec 2024, 14:18 वाजता

आरबीआयचं पतधोरण जाहीर

जागतिक पातळीवर केंद्रीय बँकांकडून ऑक्टोबरमध्ये 60 टन सोने खरेदी करण्यात आलं. त्यापैकी 27 टन सोनं रिझर्व्ह बँकेने खरेदी केलीय. रिझर्व्ह बँकेनं जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यांत 77 टन सोन्याची खरेदी केली. आरबीआयचं पतधोरण जाहीर झालीय. 
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थेच ठेवण्यात आलेत. रेपो रेट 6.5 टक्क्यांवर स्थिर आहे.
त्यामुळे व्याजदरात कुठलाही बदल झालेला नाही.