Breaking News LIVE Updates: उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबरपासून प्रचाराच्या मैदानात उतरणार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: आजचा दिवस हा राजकीय घडामोडींचा आहे. अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. तर, आजपासून अर्जाची छाननी प्रक्रिया सुरु होणार आहे. आजपासून विविध राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. राज्यातील दिवसभरातील महत्त्वाचा घडामोडींचा धावता आढावा.   

Breaking News LIVE Updates: उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबरपासून प्रचाराच्या मैदानात उतरणार

30 Oct 2024, 18:24 वाजता

उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबरपासून प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत.  5 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी येथे जाहीर सभा होणार आहे.  17 नोव्हेंबर रोजी मुंबईत सांगता सभा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात 16 नोव्हेंबर रोजी सभा होणार आहे.  उद्धव ठाकरे यांच्या  20 ते 25 जाहीर सभा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.  यामध्ये मविआच्या संयुक्त सभांचा देखील समावेश असणार आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांच्या देखील सभा होणार आहेत. 

30 Oct 2024, 13:37 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: 'काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातच सिंचन घोटाळ्याची फाईल उघडली'

काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातच सिंचन घोटाळ्याची फाईल उघडली गेली आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. 

30 Oct 2024, 12:51 वाजता

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह मोठ्या नेत्यांची नावं. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्यासह माजी मुख्यमंत्र्यांची स्टार प्रचारकांच्या यादीत नाव. महाराष्ट्रातून नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह मोठ्या नेत्यांची नावं

30 Oct 2024, 12:28 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे दिग्गज मैदानात

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांसह बडे नेते उतरणार प्रचाराच्या रिंगणात. शतकी सभांच्या माध्यमातून विधानसभा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न. पंतप्रधान मोदींच्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात एकूण ८ सभांचे नियोजन

30 Oct 2024, 12:04 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: निकालाआधीच मनसेला धक्का; अकोल्यातील उमेदवाराचा नामांकन अर्ज रद्द

अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम मतदार संघातून मनसे उमेदवार प्रशंसा आंबेरे यांचा नामांकन अर्ज रद्द करण्यात आला आहेय..विधानसभेच्या निवडणुकीकरिता निवडणूक आयोगाने 25 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तीला उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याची अट दिली आहेय..अकोला पश्चिमच्या मनसेच्या उमेदवार प्रशंसा अंबेरे यांच वय 25 पेक्षा कमी असल्याने यांचा नामांकन अर्ज छाननी दरम्यान बाद करण्यात आला आहेय..मनसे उमेदवार यांना 25 वर्ष पूर्ण करण्याकरिता 24 दिवसांचा अवधी बाकी असल्याचा कारणाने त्यांचा नामांकन अर्ज रद्द करण्यात आला आहेय..

30 Oct 2024, 11:05 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी मतदारसंघात महायुतीची मैत्रीपूर्ण लढत 

महायुतीत विदर्भामध्ये एकमेव मैत्रीपूर्ण लढत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी तर्फे आमदार देवेंद्र भुयार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून उमेश यावलकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना अधिकृत उमेदवारी मिळाल्याने महायुतीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. आमदार देवेंद्र भुयार यांना अजित पवारांच्या पक्षाने शेवटच्या क्षणी दिली उमेदवारी

30 Oct 2024, 10:45 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: मध्य रेल्वे विस्कळीत, कल्याण स्थानकात एक्सप्रेसमध्ये बिघाड

छत्रपती शिवाजी महाराज हावडा गीतांजली एक्स्प्रेसमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. कल्याण स्थानकातील प्लॅटफॉर्म 4वर अचानक बिघाड झाल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. 

30 Oct 2024, 10:07 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: आमदार देवेंद्र भुयार आणि माजी राज्यमंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्यातील वाद चव्हाट्यावर

2019 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र भुयार यांना निवडून आणण्यासाठी माजी राज्यमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी मोठी भूमिका निभावली होती त्यामुळे हर्षवर्धन देशमुख आणि आमदार देवेंद्र भुयार यांच्यात मोठे सौख्य पाहायला मिळाले होते मात्र आमदार देवेंद्र भुयार हे अजित पवार यांच्यासोबत गेल्याने भुयार आणि देशमुख यांच्यात अनेकदा खटके उडाले होते मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार देवेंद्र भुयार आणि माजी राज्यमंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले आहे 

30 Oct 2024, 09:51 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: मुंबईत शिवसेना UBT जास्त जागा लढणारः संजय राऊत

विदर्भात काँग्रेस जास्त जागा लढवणार तर मुंबईत शिवसेना UBT जास्त जागा लढणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. 

30 Oct 2024, 09:49 वाजता

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Breaking News LIVE Updates: तुळजापुरात काँग्रेसमध्ये बंडखोर, मधुकरराव चव्हाणांनी भरला अपक्ष अर्ज

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुळजापूर मध्ये काँग्रेसचा घोळ मिटला नाही. माजी मंत्री ,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांनी बंडाचे निशाण फडकवत तुळजापूर विधानसभेसाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. काँग्रेसने माझ्यावर अन्याय केला. तुळजापूर मधून मी अपक्ष निवडणूक लढवणार .कोणत्याही परिस्थितीत अर्ज माघार घेणार नाही .तुळजापूर मध्ये काँग्रेसच सांगली पॅटर्न राबवणार असं मधुकरराव चव्हाण यांनी स्पष्ट केले. काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मधुकरराव चव्हाण यांनी अपक्ष लढवणार असल्याचे जाहीर केलं.