Aditya Thackeray : दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे अडचणीत?

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Aditya Thackeray :  दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे अडचणीत?

22 Oct 2023, 22:27 वाजता

सांगलीत धनगर आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

 

Dhanagar Reservation : राज्यात मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणसाठीही आत्महत्या झाली आहे. सांगलीतील जतच्या कुणीकुन्नूर येथील आबाची वाडीतली ही घटना आहे. बिरुदेव वसंत खर्जे असं 38 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. धनगर आरक्षण मागणीसाठी त्यानं आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीत, त्यानं धनगर आरक्षण मिळण्याचा उल्लेख केला. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

22 Oct 2023, 21:29 वाजता

आदित्य ठाकरेंना अब्रुनुकसानीची नोटीस

 

Aditya Thackeray : दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.. आदित्य ठाकरेंना याप्रकरणी 19 हजार 750 कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीची नोटीस बजावण्यात आलीय. आदित्य ठाकरे यांनी खोटं शपथपत्र दाखल करून हायकोर्टाची दिशाभूल केल्याचा आरोप करत मूळ याचिकाकर्ते राशिद खान पठाण यांनी ही नोटीस पाठवलीय. हायकोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी आदित्य ठाकरेंवर कारवाईची मागणी पठाण यांनी केलीय. सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेत चौकशी करण्याची मागणी करणारी मूळ याचिका राशिद खान पठाण यांनीच केलीय. तर याप्रकरणी आदित्य ठाकरेंनी हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलंय. 

 

22 Oct 2023, 18:17 वाजता

जेजुरीच्या खंडोबाचं मुख्य मंदिर भाविकांसाठी खुलं

 

Jejuri Khandoba Temple : सा-या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडातील मुख्य मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय.. दुरुस्तीच्या कामासाठी दीड महिन्यांपासून हे मंदिर बंद होतं.. मंदिर दुरुस्तीचे बहुतांश काम पूर्ण झाल्याने शनिवारपासून भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला.. खंडोबा मंदिर भाविकांसाठी खुले झाल्याने दसऱ्यानंतर भाविकांच्या गर्दीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. खंडोबा देवस्थानतर्फे दसरा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.. गडाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीये.. दस-याच्या दुस-या दिवशी गडावर कसरतीचे कार्यक्रम होतात. त्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं गर्दी करतात.. 

 

22 Oct 2023, 17:11 वाजता

Eknath Shinde Live | Marathi News LIVE Today : 'शब्द दिल्याप्रमाणे सरकारचं काम','कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देणार','इतर समाजावर अन्याय होऊ देणार नाही','कुणाचीही फसवणूक केलेली नाही','EWS जाहिरातीतून दिशाभूल नाही', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य.

22 Oct 2023, 17:04 वाजता

Eknath Shinde Live | Marathi News LIVE Today : 'मराठा समाजातील आत्महत्या दुर्दैवी','सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूनं','मराठा समजाच्या विकासाठी कटिबद्ध','राज्य सरकारकडून क्युरेटीव्ह पिटीशन','सुप्रीम कोर्टात याचिका दाखल','कुणबी दाखल्यांसाठी युद्धपातळीवर काम','मराठा-कुणबीच्या जुन्या नोंदी तपासण्याचं काम','मराठा बांधवांनी टोकाचं पाऊल उचलू नये', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मराठा तरुणांना आवाहन

22 Oct 2023, 16:23 वाजता

छ. संभाजीनगरात 500 कोटींचं कोकेन पकडलं

 

Cocaine seized in Sambhaji Nagar : छत्रपती संभाजी नगरात कोट्यवधींचे कोकेन पकडलं. 500 कोटींचं कोकेन पकडले असल्याची माहिती. डायरेक्टर ऑफ इंटिलेजिन्स (DRI) यांची कारवाई. डायरेक्टर ऑफ रिव्हेन्यू इंटेलिजन्स या केंद्र शासनाच्या अखत्यारीतील संस्थेचे पुण्यातील कार्यालयाकडून रेड. अहमदाबादमध्ये झालेल्या कोकेन कारवाईशी संबंध. 2 जणांना अटक, रोकड ही सापडल्याची माहिती.

22 Oct 2023, 15:22 वाजता

Manoj Jarange Live | Marathi News LIVE Today : 'तालुक्यात, गावागावात कँडल मार्च काढा','25 ऑक्टोबरनंतरचं आंदोलन सरकारला झेपणार नाही','उपोषण सुरू करताना पुढचं आंदोलन कसं ते सांगणार','मला कुठल्याही वाटाघाटी नकोत','25 ऑक्टोबरपासून शांततेचं युद्ध', मनोज जरांगे यांचं वक्तव्य.

22 Oct 2023, 15:08 वाजता

Manoj Jarange Live | Marathi News LIVE Today : '24 ऑक्टोबरपर्यंत आरक्षण दिलं नाही तर उपोषण', 'मराठा समाजाला 25 ऑक्टोबरच्या आत आरक्षण द्या', मनोज जरांगे यांची राज्य सरकारकडे मागणी.

 

22 Oct 2023, 15:00 वाजता

Manoj Jarange Live | Marathi News LIVE Today : '25 ऑक्टोबरपासून जरांगेंचं पुन्हा आमरण उपोषण','ना अन्न ना पाणी घेणार, वैद्यकीय उपचारही घेणार नाही','गावात एकही नेत्याला येऊ देणार नाही', मनोज जरांगे यांची घोषणा.

 

22 Oct 2023, 13:53 वाजता

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करू नका - मनोज जरांगे-पाटील

 

Manoj Jarange Patil : झी 24 तासच्या माध्यमातून जरांगे पाटलांनी मराठा तरुणांना आवाहन केलंय...मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करू नका...आता मरायचं नाही, आरक्षणासाठी लढायचं...असं आवाहन आत्महत्या करणा-या तरुणांना जरांगे पाटलांनी केलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा -