Uddhav Thackeray vs Eknath Shinde Live Updates : राज्याच्या सत्तासंघर्षात आज तिसऱ्या दिवशी सुनावणी होणार आहे. आजही ठाकरे गटाचा युक्तीवाद सुरू राहील अशी शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या हंगामी आदेशामुळे झालेली चूक घटनापीठाने दुरूस्त करावी अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली. तसंच 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांच्याकडे सोपवला जाऊ शकतो असंही सिब्बल म्हणाले. ठाकरे गटाकडून युक्तिवाद सुरु करण्यात आला आहे. रेबिया प्रकरण, पक्षांतरबंदी कायद्याचा फेरविचार व्हावा, ठाकरे गटाची मागणी तसेच काल शिंदे गटाकडून युक्तीवाद तसेच बाजू मांडली आहे. अरुणाचल प्रदेशातील नबाम रेबिया प्रकरण, पक्षांतर बंदी कायदा याबाबत सात न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर फेरविचार व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच बहुमत चाचणीला सामोरे न जाता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार तेव्हा कोसळले याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. आता गुरुवारी पुन्हा सुनावणी सुरु झाली आहे.
23 Feb 2023, 08:28 वाजता
Uddhav Thackeray vs Eknath Shinde Updates Shiv Sena Case Hearing : राज्याच्या सत्तासंघर्षात आज तिसऱ्या दिवशी सुनावणी होणार आहे. आजही ठाकरे गटाचा युक्तीवाद सुरु राहील अशी शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या हंगामी आदेशामुळे झालेली चूक घटनापीठाने दुरूस्त करावी अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली. तसंच 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांच्याकडे सोपवला जाऊ शकतो असंही सिब्बल म्हणाले.
सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने हंगामी आदेश देत उपाध्यक्षांच्या अधिकारात हस्तक्षेप केलाय. त्यानंतर राज्यातील सत्तासंघर्षात अनेक घडामोडी झाल्या, लोकनियुक्त सरकारही कोसळलं असं सिब्बल म्हणाले. त्यावर हंगामी आदेश ही चूक असेल तर ती दुरूस्त करण्यासाठी हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं गेलं पाहीजे असं मत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मांडलं. घटनात्मक अधिकारांवर कोर्टाला गदा आणता येणार नाहीत नाहीतर त्याचे दूरगामी परिणाम होतील असं कोर्ट म्हणाले.