'मोदी कधी समोर आले तर लोक त्यांना रस्त्यावर....' संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut on PM Narendra Modi: मोदी म्हणतात 400 पार, पण तुम्ही 400 पार नाही तर 200 सुद्धा होणार नाहीत असे राऊत म्हणाले.

Updated: Apr 6, 2024, 02:39 PM IST
'मोदी कधी समोर आले तर लोक त्यांना रस्त्यावर....' संजय राऊतांचा हल्लाबोल title=
Sanjay Raut on PM Narendra Modi

Sanjay Raut on PM Narendra Modi: मोदी कधी समोर आले तर लोक त्यांना रस्त्यावर जोडे मारतील,अशी परिस्थिती आहे.हा देश गुलाम करून टाकला आहे,आपण सर्व मोदी,अंबानी याचे गुलाम आहोत, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते तासगावच्या मेळाव्यात बोलत होते. उन्हामुळे वातावरण तापले आहे. तर हळूहळू राजकारण ही तापेल आणि जसजशी शिवसेना पुढे जाताना दिसेल तसे आपल्या विरोधकांची डोके तापतील. ते आत्ताच तापलेले ही दिसतायेत. सांगलीमध्ये शिवसेना लोकसभा लढवतेय हे पाहून लोकांना आश्चर्य वाटत आहे.मक्तेदारी आपल्याकडे हवी असे त्यांना वाटत आहे. या मक्तेदारीला आव्हान देण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केल्याचे राऊत म्हणाले. 

सामान्य माणसाला शेतकऱ्याच्या मुलाला राजकारणात न येऊन द्यायची अशी भूमिका त्याची आहे.  नारायण राणे, एकनाथ शिंदे, मनोहर जोशी कोण रिक्षा चालवले कोण काय केले,  या सर्वांना शिवसेनेने मोठे पद दिले आणि या मोठ्या लोकांची मक्तेदारी मोडीत काढल्याचे ते म्हणाले. 

शिवसेना वाघाची अवलाद आहे.  जर चंद्रावर पाटलाची कोणी कोंडी करत असेल राजकारण करून तर गप्प बसणार नाही. ज्यांना भाजपला मदत करायचे आहे आम्ही गप्प बसणार नसल्याचेही ते म्हणाले. 

मोदी म्हणतात 400 पार पण तुम्ही 400 पार नाही तर 200 सुद्धा होणार नाहीत असे राऊत म्हणाले. मोदी गुजरात मधून हरतील असे भाकीतही त्यांनी केले. 

देशाला 200 वर्ष मागे घेऊन हे लोक चाललेत.त्यामुळे आम्हाला ताकत द्या,कोण काय बोलतंय यांच्याकडे लक्ष देऊ नका. मोदी कधी समोर आले तर लोक त्यांना रस्त्यावर जोडे मारतील,अशी परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हा देश गुलाम करून टाकला आहे,आपण सर्व मोदी,अंबानी याचे गुलाम असल्याची टीका त्यांनी केली. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना आम्ही आवाहन केले आहे,तुमची नौटंकी बंद करा आणि सामील व्हा. नाहीतर लोक तुम्हाला माफ करणार नाहीत. चंद्रहार पाटील यांना या मतदारसंघात प्रामाणिक पणाने मदत करा आणि मोठ्या संख्येने मेहनत करून त्यांना निवडून द्यावे, असेही सांगितल्याचे त्याने सांगितले.