महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना लुटले

महालक्ष्मी एक्स्प्रेसची जेजुरी इथल्या राजेवाडी स्टेशन दरम्यान लूट झाल्याची घटना समोर आलीये. 

Updated: Oct 26, 2017, 03:31 PM IST
महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना लुटले title=

जेजुरी : महालक्ष्मी एक्स्प्रेसची जेजुरी इथल्या राजेवाडी स्टेशन दरम्यान लूट झाल्याची घटना समोर आलीये. 

मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. मुंबईहून कोल्हापूरला येत असलेली ही एक्स्प्रेस राजेवाडी स्टेशन येथे सिग्नलमध्ये बिघाड करून लुटारूनी थांबवली. त्यानंतर चहा विक्रेत्यांचा बहाणा करत सुमारे 25 मिनिटे प्रवाशांना लुटले.

गाडीत रेल्वे सुरक्षा बलाचे जवान नसल्याने लुटारूना मोकळे रान मिळाले. त्यांनी s2  ते s12 या डब्यातील अनेक प्रवाशांचे सोने,पैसे,मोबाईल यांची मोठी लूट केली आणि तेथून पोबारा केला. 

या घटनेमुळे घाबरलेल्या प्रवाशांनी एक्सप्रेसमधील ती रात्र अक्षरश: जागून  कोल्हापुरात तीन प्रवाशानी याबाबत तक्रार दाखल केलीये.