बीड : खोदकाम करताना जीवंत नागासह सापडली कुबेराची मूर्ती

विशेष म्हणजे या मूर्ती ला एका नागाने वेटोळा घातला होता,हा सगळा प्रकार पाहून आजूबाजूच्या नागरिकांनी एकच गर्दी केली. २५ फुट खाली अंतरावर ही प्राचीन मुर्ती आढळून आली.

Updated: Apr 17, 2018, 08:31 PM IST
बीड : खोदकाम करताना जीवंत नागासह सापडली कुबेराची मूर्ती title=

बीड: जिल्ह्यातील परळी-अंबेजोगाई महामार्गाच्या कामासाठी जेसीबीचं खोदकाम करताना रस्त्याखाली एक कुबेराची दगडी मूर्ती आढळून आली. विशेष म्हणजे या मूर्ती ला एका नागाने वेटोळा घातला होता,हा सगळा प्रकार पाहून आजूबाजूच्या नागरिकांनी एकच गर्दी केली. २५ फुट खाली अंतरावर ही प्राचीन मुर्ती आढळून आली.

 नागाचा फणा वर करून फुत्कार

 जेसीबी चालकाने पुन्हा डोंगर खोदण्याचा प्रयत्न केला असता. त्या भल्या मोठ्या नागाने आपला फणा वर करून जोराचा फुत्कार सोडला. हे दृश्य पाहून जेसीबी चालकाने जेसीबी मागे घेऊन पळ काढला आणि जेसीबी मागे गेल्यानंतर तो नाग मुर्तीला पुन्हा वेटाळे घालून बसला होता. तहसीलदार शारद झाडके, नायब तहसीलदार सदानंद बरदाळे, मेजर गर्जे यांनी या ठिकाणची पहाणी केली.

 घटनेमुळे परिसरात खळबळ

दरम्यान, ही मूर्ती पाहून तसेच, मूर्तीजवळ फिरणारा नाग पाहून नागरिकामध्ये काही काळ घबराटीचे वातावरण तयार झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ तर, उडालीच आहे. पण अनेक चर्चा, तर्क-वितर्कांनाही उत आला आहे.