Lumpy skin disease : महाराष्ट्रातील शेतकरी चिंतातुर आहे. यांचं कारण आहे बळीराजाची भिस्त ज्या जनावरांवर असते त्या जनावरांवर त्यांच्यावर आलेलं संकट. अजूनही माणसावरील कोरोनाचं संकट पूर्णपणे टळलं आहे असं म्हणता येणार नाही. अशात बळीराजाच्या जनावरांवर जीवघेणं संकट ओढवलं आहे.
जनावरांमध्ये वेगानं पसरणाऱ्या लम्पी आजारानं बळीराजाची चिंता वाढवलीये. लम्पी आजाराचा दुभत्या जनावरांना जास्त धोका आहे. या आजारामुळे दुभत्या जनावरांच्या दूध उत्पादनात 10 ते 15 टक्के घट होते. तसंच जनावरांमध्ये गर्भपात आणि वंध्यत्वाचा धोका निर्माण होऊ शकतो अशी माहिती पशुवैद्यक अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची विशेष काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलंय.
या कठीण परिस्थितीत बळीराजाने जनावरांची कशी काळजी घ्यावी हे देखील पशुवैद्यक अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे..
जनावरांना होणार लंपी आजार 17 जिल्ह्यांमध्य पसरला आहे. पशु आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात जनावरांच्या वाहतुकीवर निर्बंध घातले गेले आहेत. जनावरांचे आठवडी बाजार देखील पुढील आदेश मिळेपर्यंत राज्यात बंद राहतील. परवानाधारक कत्तलखान्यांनी विना तपासणी जनावरांची वाहतूक केली तर फौजदारी गुन्हे दाखल होतील.
lumpy skin disease in animals farners creating qurantine facility for cattles