Maharashtra Assembly Session: विधानभवनाच्या बाहेरच नितेश राणे आणि अबू आझमी भिडले, जोरदार खडाजंगी

Maharashtra Assembly Session: भाजपा (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे. विधानभवनाच्या बाहेर दोन्ही नेते आमने-सामने आले असता दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. लव्ह जिहादच्या (Love Jihad) मुद्द्यावरुन दोन्ही नेत्यांनी एकमेकांना सुनावलं.   

Updated: Mar 14, 2023, 01:44 PM IST
Maharashtra Assembly Session: विधानभवनाच्या बाहेरच नितेश राणे आणि अबू आझमी भिडले, जोरदार खडाजंगी title=

Maharashtra Assembly Session: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून लव्ह जिहादच्या (Love Jihad) मुद्द्यावरुन भाजपा (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे. विधानभवनाच्या बाहेरच दोन्ही नेते आमने-सामने आले होते. यावेळी त्यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. दोघांनीही लव्ह जिहादवरुन एकमेकांना खडे बोल सुनावले.

विधानभनबाहेर प्रसारमाध्यमांसोर बोलताना नितेश राणे यांनी मदरसा अनधिकृतपणे उभारलं जात असल्याचा मुद्दा मांडला. ग्रीन झोनमध्ये मदरसा उभारले जात आहे अशी तक्रार नितेश राणे यांनी अबू आझमी यांच्याकडे केली. त्यावर अबू आझमी यांनी कोणत्याही धर्माचं असलं तरी अनधिकृत बांधकाम तोडलं पाहिजे असं मत मांडलं. त्यावर कारवाई करताना हत्यारं काढली जातात, तुम्ही माझ्यासोबत चला दाखवतो असं आव्हानच दिलं. त्यावर अबू आझमी यांनीही हे खोटं असून, मी कधीही तुमच्यासोबत येऊ शकतो. पण हे खोटं आहे. माझं तुम्हाला आव्हान आहे असं म्हटलं. 

त्यानंतर नितेश राणे यांनी लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला. पाहिल्यानंतर तुम्हालाही लव्ह जिहाद असतं हे मान्य करावं लागेल, हे माझं तुम्हाला आव्हान आहे असं नितेश राणे म्हणाले. तारीख आणि वेळ सांगा, मी तुम्हाला घेऊन जातो असं नितेश राणे म्हणाले. त्यावर अबू आझमी यांनी मी तुम्हाला खोटं आहे सांगायला 50 ठिकाणी घेऊन जातो असं प्रत्युत्तर दिलं. तुम्ही प्रेमाची भाषा करता, पण इतरांनाही हे शिकवा असं नितेश राणे यावेळी अबू आझमींना म्हणाले. 

"यांना सत्य स्विकारायचं नाही आहे. यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावं. पण सत्य ऐकण्याची ताकद यांच्यात नाही. काही मोजक्या लोकांना हाताशी धरुन त्यांना मोठं केलं जात आहे. यांच्या अशा वागण्यांमुळे त्यांना मदत होते यांना ही साधी गोष्ट कळत नाही. यांच्यामुळे जर त्या मुलींचं आयुष्य बर्बाद होत असेल तर ते योग्य नाही," असा संताप नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. 

"मी खरं बोलतोय हे त्यांना पटलं नाही. आपण आज किंवा उद्या उघडे पडणार याची त्यांना कल्पना आहे, म्हणून ते जवळ आले होते. पण यांच्यामुळे आमच्या काही हिंदू मुलींचा आयुष्य बर्बाद होणार तेव्हा हे येणार का? काही मुलींना सौदीत विकलं जातं, तेव्हा हे मदतीला येणार का? येथे बोलण सोपं आहे. त्या मुलींचं अश्रू पुसायला गेले तर यांना सत्य कळेल," असं नितेश राणेंनी सांगितलं. 

ढे ते म्हणाले "कोणी कोणाशी लग्न करावं हा त्यांचा प्रश्न आहे. पण लग्नाच्या आधी तू आशिष असतो, पण लग्नानंतर अमिन होतो हीच तर समस्या आहे. तू त्या मुलीला लग्नानंतरही हिंदू ठेव ना. तिने कुराण वाचावं, हिंदू देवतांचे फोटो काढावेत ही जबरदस्ती  का? यावरच आमचा आक्षेप आहे".