तुर्की चाल, पांढराशुभ्र रंग, रुबाबदार देहबोली, 71 लाखांच्या शनायाची बातच न्यारी

सारंगखेडच्या घोडेबाजारात यंदा दोन हजाराहून अधिक घोडे विक्रीसाठी दाखल, पण यंदा आकर्षण ठरतेय पंजाबहून आलेली शनाया घोडी

Updated: Dec 9, 2022, 09:04 PM IST
तुर्की चाल, पांढराशुभ्र रंग, रुबाबदार देहबोली, 71 लाखांच्या शनायाची बातच न्यारी title=

प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार : झुपकेदार शेपटी, तुर्की चाल, पांढराशुभ्र रंग, डौलदार बांधा. ही अदा आहे शनाया घोडीची (Horse). देशात घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा यात्रेत खास पंजाबहून (Punjab) शनाया दाखल झालीय. 70 इंचाची ही घोडी सारंगखेडा (Sarangkheda) यात्रेची शान वाढवतेय. साधारण 70 इंच उंचीची शनाया घोडी या यात्रेचं आकर्षण ठरतेय. चार वर्ष चार महिने वय असलेली शनाया ही नुकरा प्रजातीची घोडी आहे. तिचा महिन्याभराचा खर्च 70 हजारांच्या पुढे आहे. 

शनायासाठी 71 लाखांची बोली
शनायासाठी तब्बल 71 लाख रुपयांची बोली लागलीय मात्र तिला विकायचं नाही असं मालकानं ठरवलंय. उलट तिच्या देखरेखीसाठी चोवीस तास दोन कर्मचारी ठेवण्यात आलेत. अख्ख्या देशात घोड्यांच्या खरेदी-विक्रीसाठी सारंगखेड्याची यात्रा प्रसिद्ध आहे. कोट्यवधी रुपये किंमतीचे घोडे या यात्रेत येत असतात. यंदाच्या यात्रेचं मात्र पंजाबहून आलेली शनाया घोडी आकर्षण ठरतेय. 

हे ही वाचा : प्रियकराच्या मदतीने मैत्रीणीच्याच घरी लाखोंचा डल्ला, खरेदी केला आयफोन, फ्रिज आणि फर्निचर

यात्रेत दोन हजार घोडे दाखल
नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील सारंगखेडातला घोडेबाजार देशभरात प्रसिद्ध आहे. यंदा या घोडेबाजारात दोन हजार पेक्षा अधिक घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. कोरोनानंतर पूर्ण क्षमतेने यावर्षी अश्वयात्रा भरल्याने अश्वशौकीनही या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये 150 घोड्यांची विक्री झाली असून त्यातून 44 लाख रुपयांची यात उलाढाल झाली आहे. या यात्रेत हजारोपासून  करोडो रुपयांपर्यंतचे घोडे विक्रीसाठी आहेत. सारंगखेडा यात्रा मारवाडी, पंजाबी, काठेवाडी, सिंधी, आणि ब्लडलाईनचे घोडे विक्रीसाठी उपलब्ध असतात.

हे ही वाचा : जन्मदात्या वडिलांपेक्षा आईस्क्रिम महत्त्वाचं, पुण्यात मुलींची वडिलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण

अनेक वर्षापासून सारंगखेडा यात्रेत अश्व पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी अशोप्रेमींची येथे रेलचेल पाहायला मिळते. सारंगखेडा या चेतक फेस्टिवलमध्ये जातिवंत, रुबाबदार आणि शानदार अश्व पाहण्याची पर्वणी आहे, या पर्वणीचा सहकुटुंब आनंद घेण्यासाठी आणि मुलांचा अश्वांची दुनिया दाखवण्यासाठी एकदा अवश्य या यात्रेला भेट द्या.