दहावीचा निकाल ऑनलाईन, येथे पाहा तुमचा निकाल

निकाल पाहण्यासाठी पटकन, अचूक माहिती भरा.

Updated: Jun 8, 2018, 12:38 PM IST

पुणे : आज दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होतोय. आज दुपारी १.०० वाजता हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. १ मार्च ते २४ मार्चपर्यंत दहावीची परीक्षा झाली होती. या परीक्षेला एकूण १७ लाख  ५१ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात १६ लाख ३७ हजार ७८३ नियमित विद्यार्थी होते. एकूण विद्यार्थ्यांपैकी ९ लाख ७३ हजार १३४ विद्यार्थी आणि ७ लाख ७८ हजार २१९ विद्यार्थिनींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. निकाल पाहण्यासाठी खाली तुमची माहिती भरा.

निकाल पाहण्यासाठी खाली तुमची माहिती भरा