यशश्री शिंदे प्रकरणी मोठी घडामोड; अखेर दाऊदला अटक, पाठलाग करतानाचा तो CCTV समोर

Yashashri Shinde Case: यशश्री शिंदे प्रकरणातील एक cctv समोर आला आहे. तर, पोलिसांनी मुख्य आरोपी दाऊदला ताब्यात घेतलं आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 30, 2024, 08:28 AM IST
यशश्री शिंदे प्रकरणी मोठी घडामोड; अखेर दाऊदला अटक, पाठलाग करतानाचा तो CCTV समोर title=
Man Detained In Murder Case Of 20 Year Old Girl In Navi mumbai

Yashashri Shinde Case: उरणमधील यशश्री शिंदे हत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. यशश्रीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह निर्जनस्थळी फेकण्यात आला. इतक्या अमानुषपणे तिचा जीव घेण्यात आला. या घटनेने संपूर्ण राज्यातून संतापाची लाट पसरली आहे. आता या प्रकरणात एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. यशश्रीच्या हत्येपूर्वीचा हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात येत आहे. आरोपी दाऊद शेख यशश्रीचा पाठलाग करत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. 

उरण येथील यशश्री शिंदे या तरुणीच्या हत्येप्रकरणी पोलिस सर्व तांत्रिक बाजूदेखील तपासत आहेत. तरुणी ज्या दिवशी गायब झाली त्या दिवसाचे सर्व CCTV पोलिस शोधून काढत आहेत. ज्या परिसरात तिची निर्घृण हत्या करण्यात आली त्या परिसरातील एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. उरण परिसरातील हा व्हिडिओ असून आरोपी दाऊद शेख यशश्रीचा पाठलाग करत असल्याचे दिसत आहे. यशश्री पुढे चालत असताना मागून आरोपी दाऊद शेख तिचा पाठलाग करत आहे. 

पोलिसांच्या हाती लागलेला हा सीसीटीव्ही यशश्रीच्या हत्येच्या आधीचा असल्याचे समोर आले आहे. यशश्रीच्या हत्येनंतर पोलिस युद्धपातळीवर तपास करत आहेत. ज्यादिवशी यशश्री गायब झाली त्या दिवशीपासूनच सर्व सीसीटीव्ही पोलिस तपासत आहेत. पोलिस सर्व तांत्रिक बाजूने तपास करत आहेत. आरोपी दाऊद शेखला ताब्यात घेण्यासाठी नवी मुंबई पोलिसांची पाचहून अधिक पथकं कर्नाटक आणि बेंगळुर येथे गेली आहेत. त्याचा कसून शोध घेतला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी दाऊद शेखला अटक केली आहे. तसंच, दाऊदचा मित्र मोहसीनलादेखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

आरोपी दाऊद शेखला या प्रकरणात आणखी कोणी मदत केलीये का याचाही तपास पोलिस करत होते. अखेर पोलिसांना यात यश आलं आहे. नवी मुंबई पोलिसांनी दाऊद शेखला कर्नाटकमधून अटक केली आहे. कर्नाटकच्या गुलबर्गायेथून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचबरोबर मोहसीन नावाच्या इसमालादेखील अटक केली आहे. मोहसीन हा यशश्रीच्या संपर्कात असल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शेवटचं संभाषण देखील यशश्री आणि मोहसीन मध्ये झाल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे.