बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला,प्रेमप्रकरणातून हत्येचा संशय

मृतदेह आढळला तिथे तरुणाचे हात दुप्पट्याने बांधले होते

Updated: Jul 29, 2021, 09:29 AM IST
बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला,प्रेमप्रकरणातून हत्येचा संशय

नागपूर : नागपूर शहरालगतच्या गुमगाव परिसरात एका तरुणाचा मृतदेह बुधवारी आढळला.या तरुणाचा गळा आवळून हत्या झाल्याचं संशय व्यक्त करण्यात येत आहे.सुखदेव देवाजी वरखडे असं मयत तरुणाचं नाव आहे.प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय आहे.

सुखदेव सोमवारी (वय 30) मासेमारी करण्यासाठी सोमवारी  घरून निघाला  होता.मात्र त्यानंतर तो कुणालाच दिसला नाही. दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा भाऊ राजकुमार वरखडे त्याचा शोधत होता. सुखदेवचं शोध सुरु असताना बुधवारी वागधरा-गुमगावच्या जुन्या बंद असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या पंप हाऊस जवळ त्याचा मृतदेह आढळला.त्यामुळं सर्वजण हादरून गेले..याबाबत हिंगणा पोलिसांना देण्यात आली.

मयताचे दोन्हीही हात दुपट्ट्याने बांधले होते. शिवाय त्याच्या गळ्याला दुपट्टा गुंडाळलेल्या अवस्थेत होता.तर त्याच दुपट्ट्याचा तुटलेला दुसऱ्या टोकाचा काही भाग पंप हाऊसच्या इमारतीला असलेल्या लोखंडी रेलिंगला बांधण्यात आला होता.सुखदेवला गळा आवळून मारल्यानंतर त्या इमारतीच्या लोखंडी सळाखिला लटकवून आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न आरोपीनी केला असावा परंतु दुपट्टा मधातून तुटल्याने मृतदेह खाली पडला असा संशय पोलिसांना आला. घटनास्थळी फॉरेन्सिक तपासणी पथक बोलावण्यात आली. व वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी तपास सुरु केला आहे.

हत्या प्रेमप्रकरणातून ?

हिंगणा पोलिसांनी याप्रकरणी तपासाची चक्रे फिरविल्यानंतर याप्रकरणी हत्येचा संशय बळवला आहे. मृतकाचे गावातील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. तिचं लग्न ठरल्यानंतर तिच्या भावासोबत मयताचा चारपाच दिवसांपूर्वी वाद झाला यातच मुलीच्या भावाला मृतक सुखदेवने लग्न केल्यास बघून घेण्याची धमकी दिली होती. यातूनच ही हत्या झाली असावी असा संशय पोलिसांना आहे.