मराठा आरक्षण : परभणी येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने सरकार विरोधात घोषणाबाजी

मराठा आरक्षणाचा विषय घटना पिठाकडे गेल्यानंतर आता राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.  

Updated: Sep 11, 2020, 03:09 PM IST
मराठा आरक्षण : परभणी येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने सरकार विरोधात घोषणाबाजी  title=
संग्रहित छाया

परभणी : मराठा आरक्षणाचा विषय घटना पिठाकडे गेल्यानंतर आता राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. परभणी येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे.  सरकार विरोधात घोषणाबाजी देत निषेध आंदोलन करण्यात आले. 

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात हे आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून काहींना आपले प्राण गमवावे लागले. विविध संघटना आणि मराठा समाजाने हजारो उपोषणे केली. जिल्ह्या जिल्ह्यातून भव्य मूक मोर्चे काढून सरकारचे लक्ष वेधले गेले.

असे असतांना मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे. उच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी होत असतांना याकडे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा घटना पिठाकडे गेला, असा आरोप यावेळी संभाजी ब्रिग्रेडने केला आहे.