मुंबई : राज्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये देखील यापुढं मराठी भाषा वापरणं सक्तीचं करण्यात आलंय. राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागानं तसं परिपत्रकच जारी केलंय.
त्रिभाषा सूत्रानुसार प्रत्येक राज्यात हिंदी आणि इंग्रजीबरोबर त्या राज्यातील राजभाषा वापरणं बंधनकारक आहे. मात्र आपल्या राज्यातील केंद्र सरकारच्या अनेक कार्यालयांमध्ये केवळ हिंदी आणि इंग्रजीचा वापर होतो. मात्र मराठी भाषेचा वापरच केला जात नव्हता. याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर राज्य सरकारनं नव्यानं याबाबतचं काढलंय. हे परिपत्रक केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांना पाठवण्यात आलंय.