वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया पेच, सरकारचा अध्यादेश यांना मान्य नाही!

सरकारच्या या अध्यादेश विरुद्ध नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या डीन कार्यालयाबाहेर प्रदर्शन करत घोषणाबाजी दिली.  

Updated: May 17, 2019, 10:27 PM IST
वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया पेच, सरकारचा अध्यादेश यांना मान्य नाही! title=

नागपूर : वैद्यकीय (मेडिकल) पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सरकारने काढलेला अध्यादेश खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मान्य नसल्याचे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सांगितले. सरकारच्या या अध्यादेश विरुद्ध नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या डीन कार्यालयाबाहेर प्रदर्शन करत घोषणाबाजी दिली. यावेळी विद्यार्थासोबत त्यांचे पालक देखील उपस्थित होते. त्यानंतर मेडिकल प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

अध्यादेशानुसार मेडिकलच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एसईबीसी आरक्षण लागू करण्यात येणार आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खाजगी व अभिमत विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर करण्यात आले आहे ते आम्हाला मान्य नसल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.

पदयुवत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ८० टक्के आरक्षण आहे हे जर पूर्वी माहित असते तर वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेतलाच नसता अशीही प्रतिक्रिया यावेळी विद्यार्थ्यांनी दिली... मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या आम्ही विरोधात नाहि मात्र ते लागू करण्यापूर्वी जागा वाढवणे आवश्यक होते. चांगली रँक मिळून सुद्धा चांगले महाविद्यालय मिळत नाही असा आरोपही यावेळी विद्यार्थ्यांनी केला.

तर आता जागा जास्त व सामाजिक आर्थिक मागास वर्गाचे विद्यार्थी कमी अशी परिस्थिती असल्याचा आरोप पालकांनी केला... राज्य सरकारच्या अध्यादेशाविरुद्ध आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी यावेळी दिला.