Maharashtra Weather Rain Alert : राज्यातील वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मार्च महिना संपत आल्या असताना उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहेत. तरदुसरीकडे ढगाळ वातावरण (Rain alert) आणि अचानक पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शुक्रवारी राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस झाला. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात काही ठिकाणी पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नुकसानही मोठ्या प्रमाणात झालंय. काही ठिकाणी गारपीटही झालीय.(meteorological department predicted rain next 3 to 4 days alert nagpur orange alert mumbai imd updates in marathi )
मुंबईच्याही (Weather Today mumbai) अनेक भागात शुक्रवारी पावसाच्या सरी आल्या. ठाणे, दिवा,डोंबिवली, कल्याण,उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण परिसरात रिमझिम पाऊस झाला. (Today Weather Update)
दरम्यान आज 17 मार्चलाही ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शुक्रवारी झालेल्या गारपीट पावसामुळे राज्याच्या अनेक भागात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतकरी हवालदिल झालाय. राज्यात अवकाळी पाऊस आणि 2 ते 3 दिवस पडण्याचा इशारा देण्यात आलाय. (imd predicted rain)
मुंबईसह ठाणे, पालघर भागात पावसाच्या सरी येतील. तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रात नाशिक, नंदुरबार, जळगाव विदर्भात चंद्रपूर, नागपूर, अमरावती, बुलढाणा आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीटीसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
विदर्भात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. नागपूर विभागात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली तसेच पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यात अमरावती,अकोला, यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम येथेही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.