Mhada Lottery: दिवाळीच्या मुहूर्तावर घर खरेदी करण्यासाठी आनंदाची बातमी

Diwali 2022: 20 ऑक्टोबर 2022 ला उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सोडतीचा शुभारंभ होणार आहे. विशेष म्हणजे शहरातील नामांकित बिल्डरांच्या प्रोजेक्टमध्ये ही घरं असणार आहेत. 

Updated: Oct 18, 2022, 09:10 AM IST
Mhada Lottery: दिवाळीच्या मुहूर्तावर घर खरेदी करण्यासाठी आनंदाची बातमी title=
mhada lottery pune Diwali 2022 nmp

Pune Mhada Lottery 2022 : दिवाळीच्या मुहूर्तावर (Diwali 2022) घर खरेदी करण्यासाठी आनंदाची बातमी आहे. सर्वसामान्याचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण म्हाडाकडून (Mhada) तब्बल 4 हजार घरांची (house) सोडत जाहीर केलीय. 20 ऑक्टोबर 2022 ला उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते या सोडतीचा शुभारंभ होणार आहे. विशेष म्हणजे शहरातील नामांकित बिल्डरांच्या प्रोजेक्टमध्ये ही घरं असणार आहेत. 

पुणेकरांसाठी खूशखबर! (Good news for Pune)

'या' शहरात पण घरं घेण्याची संधी

पुणे म्हाडाकडून (Pune Mhada) तब्बल 3 हजार 930 घरांची सोडत काढण्यात येणार आहे. गेल्या दोन अडीच वर्षांत पुणे म्हाडाने मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील (Nitin Mane-Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली सात बंपर सोडत काढत त्यांनी नवा विक्रम केला आहे. त्यांचा या प्रयत्नांमुळे दोन वर्षांमध्ये जवळपास 27 हजार 118 सर्वसामान्यांचे हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. पुणे (Pune), पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad), सांगली (sangli), सोलापुरामध्येही (Solapur) घरं घेण्याची संधी आहे. (mhada lottery pune Diwali 2022 nmp)

'या' तारखा लक्षात ठेवा!

गुरूवारपासून म्हणजे 20 ऑक्टोबर 2022 ला नोंदणी तर शुक्रवारपासून 21 ऑक्टोबर 2022 अर्जविक्री स्वीकृती प्रक्रिया सुरू होणारंय. तर 15 डिसेंबर 2022 ला सोडत निघणारंय. तर पुणे म्हाडाकडून एकून 11 ऑनलाईन सोडत काढण्याचा मानस आहेत. त्यापैकी 7 सोडत आतापर्यंत काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे कमी बजेटमध्ये आणि आपलं हक्काचं घर घेण्याची ही उत्तम संधी आहे.