'झी 24 तास'चे मिथुन राज्याध्यक्ष यांचा कोल्हापूर प्रेस क्लबकडून गौरव

कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट कॅमेरामन पुरस्कार यंदा 'झी 24 तास'चे व्हिडिओ जर्नालिस्ट मिथुन राज्याध्यक्ष यांना प्रदान करण्यात आला.

Updated: Jan 7, 2020, 12:13 AM IST
'झी 24 तास'चे मिथुन राज्याध्यक्ष यांचा कोल्हापूर प्रेस क्लबकडून गौरव title=

कोल्हापूर : कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट कॅमेरामन पुरस्कार यंदा 'झी 24 तास'चे व्हिडिओ जर्नालिस्ट मिथुन राज्याध्यक्ष यांना प्रदान करण्यात आला. कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन मध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते आणि गृह राज्यमंत्री सतेज पाटील, क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.  

यावेळी झी 24 तास या वृत्तवाहिनीसाठी मिथुन राज्याध्यक्ष यांनी टिपलेला सुजाता आंबी यांचा व्हिडीओ देखील दाखवण्यात आला. आंबेवाडीच्या पूरग्रस्त सुजाता आंबी यांनी महापुरातून सुटका झाल्यानंतर जवानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली होती. 

जवानांच्या पाया पडतानाची हीच दृश्यं मिथुन राज्याध्यक्ष यांनी टिपली होती. सुजाता आंबी यांचा हा व्हिडीओ संपूर्ण देशभर व्हायरल झाला होता. 

इतकंच नाही तर अनेक मान्यवर, अभिनेते यांनी देखील आपल्या स्टेटसला हा व्हिडिओ ठेवला होता. भारतीय लष्कराने देखील अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ ट्विट केला होता.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x