अमरावती : मुख्यमंत्र्यांनी सुद्धा 'मातोश्री'वर हनुमान चालीसा वाचावी. अन्यथा मी आणि खासदार नवनीत राणा मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचू असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला होता.
आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसा पठणावरून मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आव्हानाला शिवसेनेकडून चोख प्रती उत्तर देण्यात आले.
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या अमरावती येथील गंगा सावित्री निवासासमोर शिवसैनिकांनी साउंडवर हनुमान चालिसा वाजवत आंदोलन केले.
या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना आमदार रवी राणा यांनी 'शिवसेनेचे हे आंदोलन फक्त फोटोसेशनसाठी आहे. शिवसेनेच्या वरील नेत्यांना खुश करण्यासाठी हे आंदोलन केल्यास त्यांनी सांगितले.
आपल्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांचे स्वागत आमदार रवी राणा यांनी सरबत पाजून केले. राज्यात उन्हाळा वाढत आहे. या शिवसैनिकांना त्रास नको यासाठी ही काळजी घेण्यात आल्याचे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.