close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

राज्यात १ कोटीहून अधिक तरुण बजावणार मतदानाचा हक्क

राज्यात तरुण मतदार निवडणार आमदार...

Updated: Oct 10, 2019, 10:42 AM IST
राज्यात १ कोटीहून अधिक तरुण बजावणार मतदानाचा हक्क

मुंबई : यंदाच्या निवडणुकीत राज्यात १ कोटीहून अधिक तरुण मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 18 ते 25 वयोगटातले 1 कोटी 6 लाख 76 हजार 13 तरुण मतदारांनी नोंदणी केली आहे. यात 60 लाख 93 हजार 518 युवक तर 45 लाख 81 हजार 884 युवती आहेत. 611 तृतीयपंथीयांनीही मतदार यादीत नोंद केली आहे. 4 ऑक्टोबर 2019 पर्यंत केलेल्या नोंदणीत 8 कोटी 99 लाख 36 हजार 261 मतदारांनी नोंदणी केली. यात एकूण 5 हजार 560 अनिवासी भारतीयांची नोंद आहे. अनिवासी भारतीय पुरुष 4 हजार 54 आहेत तर 1 हजार 506 अनिवासी भारतीय महिलांची नोंद आहे.

गेल्या 5 वर्षांत देशभरात मतदारांची संख्या 8.4 कोटींनी वाढली आहे. ज्यामध्य़े 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या तब्बल 1.5 कोटींच्या घरात होती. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांवेळी देशभरात 81 कोटी मतदार होते. तर 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये तब्बल 90 कोटी मतदारांची नोंद होती. 2014 साली राज्यात 8 कोटी 25 लाख मतदार होते.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 21 ऑक्टोबर रोजी होणार असून एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 24 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. याआधी 15 ऑक्टोबर 2014 रोजी मतदान झाले होते. तर 19 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक म्हणजेच 122 जागा मिळाल्या होत्या तर शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 42 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या.