'मॅजिक मिक्स'मुळे बेस्टचे ५ हजार कर्मचारी झाले तंबाखू मुक्त

 'मॅजिक मिक्स' तंबाखू विरूध्द असा पर्याय निर्माण झालाय ज्याने कर्मचाऱ्यांना कॅन्सर पासुन दूर ठेवले आहे. 

Updated: Feb 23, 2019, 11:26 AM IST
'मॅजिक मिक्स'मुळे बेस्टचे ५ हजार कर्मचारी झाले तंबाखू मुक्त title=

 

सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई : बेस्टचे कर्मचारी वाहन चालवताना विरंगुळा म्हणुन तंबाखू खातात ह्याचा विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो ह्या तंबाकुच्या सेवनामुळे बेस्टची ड्रायव्हर केबीन अनेकदा अस्वच्छ असायची कालातराने ह्या व्यसनाचे रूपांतर कर्करोगात होतो. हे नुकसान रोकण्यासाठी तीन वर्षांपुर्वी तंबाखू मुक्त बेस्ट हा कार्यक्रम प्रशासनाने सुरू केला. आयुर्वेदीक पध्दतीने बेस्ट कर्मचाऱ्यांची तंबाखू खाण्याची सवय सोडवण्यात यश आहे. 'मॅजिक मिक्स' तंबाखू विरूध्द असा पर्याय निर्माण झालाय ज्याने कर्मचाऱ्यांना कॅन्सर पासुन दूर ठेवले आहे.

Image result for best bus driver maharashtra zee

बेस्टच्या कर्मचारींच्या खिशात आता तुम्हाला मॅजिक मिक्स ची डबी दिसली तरी आश्चर्य वाटू देवू नका.  लवंग दालचिनी बडीशेप ओवा ह्यांची पावडर केल्यास तंबाखूसारखा पदार्थ तयार होतो आणि चुना म्हणुन तांदुळ पावडर वापरली जाते .अश्या पध्दतीचे हे मॅजिक मिक्स तंबाखूची तलप आल्यावर तोंडात टाकली तरी त्याचा फायदा होणार आहे. 

भारतात हजारो लोक कॅन्समुळे जीवन संपते असे असुनही व्यसनाशी जोडलेले नाते लोकांना तोडता येत नाही. परंतु मॅजिक मिक्स बनवणाऱ्या डॉ. अनिलकुमार सिंगल यांच्या म्हणण्याप्रमाणे या मॅजिक मिक्सची पावडर ना केवळ तुम्हाला तंबाखू पासुन दुर ठेवते तर याचे सेवन तुमच्या व्यसनाधीनतेला संपुष्टात आणते.

Image result for best bus driver maharashtra zee

बेस्टच्या तंबाखू मुक्त मिशनमध्ये प्रत्येक शनिवारी कर्मचाऱ्यांचे समुपदेशन केले जाते. काही वेळा कुटुंबियांसमवेत कर्मचाऱ्यांनचे समुपदेशन केले जाते आणि विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पत्नींना मॅजिक मिक्स बनवायला शिकवल जाते आणि घरच्या घरी तंबाखू मुक्तीचा पर्याय अनेकांना मिळतो . लवकरच हा पर्याय देशभरात आमलात यावा असा डॉक्टरांचा मानस आहे 
तंबाकुची सवय ते कॅन्सर ह्यात अनेकांचे नुकसान होते पण आयुर्वेदीक पर्याय दर हातात असेल तर तंबाखू मुक्त होण सहज शक्य आहे.