ज्येष्ठ नेते प्रा.एन.डी. पाटील यांच निधन, वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास

राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं

Updated: Jan 17, 2022, 07:47 PM IST
ज्येष्ठ नेते प्रा.एन.डी. पाटील यांच निधन, वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास title=

मुंबई : ज्येष्ठ नेते प्रा.एन.डी. पाटील यांच निधन झालं आहे. वयाच्या 93 व्या वर्षी एन डी पाटील यांनी घेतला अखेरचा श्वास.  ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून लढाई करणारे लढवय्ये नेते म्हणून प्रा. एन. डी .पाटील यांना ओळखलं जातं. (N D Patil Passed away Senior leader took last breath at Kolhapur ) कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.

ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसापासून कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. वातावरणातील बदलामुळे एन. डी. पाटील यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.  उपचारादरम्यान त्यांना दोन ब्रेन स्ट्रोक येऊन गेले आहेत. त्यामुळे त्यांचे बोलणेही बंद झाले आहे.

मागच्या दोन दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नपाणी देखील गेलेले नाही. ते उपचारास फारसा प्रतिसाद देत नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.