पवारांच्या ताफ्यातील वाहनाची बाईकस्वाराला धडक

 पवारांची गाडी पूर्णपणे सुरक्षित असून शरद पवार ही पूर्णपणे सुरक्षित आहेत.

Updated: Nov 14, 2019, 02:13 PM IST
पवारांच्या ताफ्यातील वाहनाची बाईकस्वाराला धडक

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील भारसिंगी वरून खापाकडे जाताना जामगाव जवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील एका वाहनाने ( बोलेरो जीप ) बाईक स्वाराला जोरदार धडक दिली. या घटनेत बाईक स्वार गंभीर जखमी झाला असून   बाईकचे ही नुकसान झाले आहे. धडक देणारी बोलेरो MH 31 DZ 0770 ही गाडी पवार यांच्या ताफ्यात शरद पवार यांच्या वाहनाच्या 4 ते 5 वाहन मागे चालत होती.

अचानक ब्रेक लागल्यामुळे ही घटना झाली असे सांगितले जात आहे. 

पवार यांच्या ताफ्यातील एमबुलेन्स मध्ये जखमी तरुणाला लगेच जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले आहे. 

शरद पवार यांची गाडी अपघाताच्या वेळी समोर होती. पवारांची गाडी पूर्णपणे सुरक्षित असून शरद पवार ही पूर्णपणे सुरक्षित आहेत.