नाशिक जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडी?

उत्तर महाराष्ट्रात आता अहमदनगरपाठोपाठ नाशिक आणि जळगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग होणार

Updated: Jan 2, 2020, 09:59 AM IST
नाशिक जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडी? title=

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात आता अहमदनगरपाठोपाठ नाशिक आणि जळगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग होणार असल्याचे संकेत ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. सध्या नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेना आणि काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे हाच पॅटर्न पुढे कायम राहण्याची चिन्ह आहेत. 

मात्र जळगाव जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आहे. त्यामुळे याठिकाणी भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिली आहे. 

तर दुसरीकडे शनिवारी भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सर्व सदस्यांची एकत्रित बंददाराआड बैठक घेतली. एकनाथ खडसे नाराज असल्यामुळे ते नेमकं काय भूमिका घेतात यावर सत्तेची समीकरणं अवलंबून आहेत. त्यामुळे जळगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.