मोठी बातमी : नितीन राऊत यांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता

काँग्रेसकडील खात्यांमध्ये फेरबदलाचे संकेत 

Updated: Feb 9, 2021, 03:30 PM IST
मोठी बातमी : नितीन राऊत यांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता title=

रामराजे शिंदे, नवी दिल्ली : काँग्रेसकडील खात्यांमध्ये फेरबदलाचे संकेत आहेत. तसेच महत्त्वाची बातमी म्हणजे नितीन राऊत यांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. तर नितीन राऊतांचं खातं पटोलेंकडे जाण्याची शक्यता आहे. पटोले, राऊत यांची राहुल गांधींसोबत चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मंत्री नितीन राऊत यांनी आज सोनिया गांधी यांची भेट घेतलीय. या भेटीमुळे मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.  यावेळी नाना पटोले यांनी झी२४तास सोबत बोलताना म्हटलं की, मंत्रीपद देण्याचा अधिकार पपक्षश्रेष्ठींचा आहे. खुर्ची मिळाली तर न्याय देण्याचा माझा स्वभाव आहे. पक्षात लोकशाही असल्यानं नितीन राऊत आणि मी भेटलो.

महाविकासआघाडी सरकारमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपद शिवसेना स्वत:कडे ठेवून काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला ऑफर करण्यात आलं. त्यासाठी काँग्रेसने शिवसेनेला ऑफर केल्याची माहिती आहे.

नाना पटोले यांना नितीन राऊत यांचं खातं दिलं जावू शकतं. आक्रमक आणि काँग्रेसमधील दलित चेहरा असलेले नितीन राऊत यांना उपमुख्यमंत्रिपद मिळू शकतं. काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्रिपदासाठी अनेक नेते इच्छूक असले तरी नितीन राऊत यांना पद मिळण्याची शक्यता आहे.