'मास्क नाही तर उमेदवारी नाही', सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना खडसावले

 मास्कवरुन (Mask) राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी कार्यकर्त्यांना चांगलेच खडसावले.

Updated: Jun 17, 2021, 08:19 PM IST
'मास्क नाही तर उमेदवारी नाही', सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना खडसावले

बारामती, पुणे : राज्यात कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा धोका कमी झालेला नाही. कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने राज्यात निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता आणली गेली आहे. मात्र, आजही अनेक लोक विना मास्क वावरताना दिसत आहेत. मास्कवरुन (Mask) राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी कार्यकर्त्यांना चांगलेच खडसावले.

विमा मास्कवाल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, जेव्हा राजकीय कार्यकर्ते मास्क वापर नाहीत, ही बाब राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या लक्षात येताच त्यांचा पारा चढला. त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दमच भरला. 'मास्क नाही तर उमेदवारी नाही', हे धोरण अवलंबावे लागले, असे खडसावले.

खासदार सुप्रिया सुळे या बारामतीनंतर इंदापूर तालुक्यात दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांच्या कार्यक्रमादरम्यान, काही कार्यकर्ते विनामास्क दिसून आले.  ज्या सदस्यांचे तीन वेळा विनामास्क फोटो पुढे येतील, त्यांना तिकीटच देऊ नका, असा दमच सुप्रिया सुळे यांनी दिला. उपमुख्यमंत्री अजितदादांचा मास्क दीड वर्षात खाली नाही आला. काही सेकंदात ते पुन्हा घालतात, याची आठवणही त्यांनी कार्यकर्त्यांना करुन दिली. इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी गावात त्या बोलत होत्या.

दरम्यान, यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. केंद्र सरकारने आमचा खासदार निधी कट केला आहे. त्यामुळे विकासकामांना अडचण निर्माण झाली आहे, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.