साई उत्सवाच्या केवळ ४ दिवसात इतक्या कोटींचं विक्रमी दान

१९ दिवसांत २ कोटी २२ हजार १९८ भाविकांनी साईसमाधीचं दर्शन घेतलं. 

Updated: Oct 20, 2018, 07:36 PM IST
साई उत्सवाच्या केवळ ४ दिवसात इतक्या कोटींचं विक्रमी दान  title=

शिर्डी : साई समाधी शताब्दी सांगता वर्षाच्या उत्सवात ४ दिवसांत भाविकांनी साईचरणी ५.९७ कोटी रुपयांचं विक्रमी दान अर्पण केलंय. यात दक्षिणा पेटीत २ कोटी ५२ लाख ८९ हजार ४२६ रुपये, देणगी काउंटरवर १ कोटी ४६ लाख ५० हजार ३३६ रुपये, डेबीट-क्रेडिट कार्ड, ऑनलाईन चेक आणि डीडी द्वारे १ कोटी ४१ लाख ३४ हजार ५०० रुपये इतकी रक्कम दान दिलीये. तर २६ लाख ७ हजार २९४ रुपये किंमतीचं सोनं, २ लाख १७ हजार ९४५ रुपये किंमतीची चांदी तसंच २४ लाख ५५ हजारांचं परदेशी चलन साईभक्तांनी साईचरणी अर्पण केलंय.

या  व्यतिरिक्त भिक्षा झोळीत गहु, तांदुळ ज्वारी, गुळ, खाद्य तेल या द्वारे २ लाख ६७ हजार ४१२ रुपये आणि ९२ हजार ६६६ रुपयांची रोख रक्कम साई चरणी अर्पण केलीये.

२ कोटी भाविकांनी घेतलं दर्शन 

 १ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर या १९ दिवसांत २ कोटी २२ हजार १९८ भाविकांनी साईसमाधीचं दर्शन घेतलं.

१कोटी ६५ लाख १८ हजार २०१ भाविकांनी साईबाबांच्या प्रसादलायात मोफत भोजनाचा लाभ घेतला.

या वर्षभरात 65 लाख 66 हजार 500 रुपय लाडूंची विक्री करण्यात आलीयं.