मूर्तिकाराच्या नजरेतून मोहंजोदडो संस्कृती, सुबोध पोद्दार यांची खास मुलाखत

चित्रकार, मूर्तिकार ते क्रिएटिव्ह डायरेक्टर....सुबोध पोद्दार यांची दिलखुलास मुलाखत, व्हिडीओ

Updated: Jul 12, 2021, 07:53 PM IST
मूर्तिकाराच्या नजरेतून मोहंजोदडो संस्कृती, सुबोध पोद्दार यांची खास मुलाखत title=

मुंबई: समजाला विविध क्षेत्रात पुढे घेऊन जाणारं उत्तुंग असं नेतृत्व करणारी व्यक्तीमत्त्व आपल्या अवतीभवती असतात. अशाच एका अवलिया व्यक्तीमत्त्वाची मराठी लिडर्स या खास कार्यक्रमात झी 24 तासचे संपादक निलेश खरे यांनी मुलाखत घेतली. हे व्यक्तीमत्त्व खास आहे कारण आपल्या कौशल्यातून चित्रांच्या जादूनं त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. 

सुबोध पोद्दार यांच्यासोबत संवाद साधताना खूप गोष्टी उलगडत गेल्या. चुका करत शिकत जाणं. हा कलाकाराचा मूळ स्वभाव हाच स्वभाव सुबोध पोद्दार यांच्या चित्रांमध्ये आहे. धावता चित्रकार म्हणून प्रसिद्ध तर आहेच पण त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची चित्र नुसती बोलकीच नाही तर रसिकांना पाहणाऱ्या प्रत्येकाला खेळवून ठेवतात. 

'माझं साधारण 27 सेकंदामध्ये एक चित्रपूर्ण होतं. ते चित्र झालं की पुन्हा त्यामध्ये बदल करावा किंवा अजून वाढवावं असं वाटत नाही. नृत्यातून मला प्रेरणा मिळते. मला कधीच नुसती उभं राहिलेली पोझ असलेलं चित्र काढायला आवडत नाही. तर त्यामध्ये एक हालचाल हवी. तर त्या चित्रात मजा येते.' असंही सुबोध पोद्दार यांनी सांगितलं.

'मी लहानपणी शिल्पकला करायचो. त्यामुळे जेव्हा मी रियाटरमेंट घेतली तेव्हा मी पुन्हा त्याकडे वळायचं ठरवलं. त्यावेळी मी सुरुवातीला डान्सर मूर्तिमध्ये उतरवायचं ठरवलं.' मोहंजोदडो संस्कृती आणि त्याचा मूर्तिकलेसोबत असलेला संबंध खूप उत्तम पद्धतीनं त्यांनी उलगडून सांगितला आहे.