मुंबई: मुंबई: देशात 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपला टफ फाईट देऊन ममता बॅनर्जी पुढे जात आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रात पंढरपूर मतदारसंघात विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीचा पहिला कल हाती आला आहे.
भाजपला पुन्हा मागे सोडत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके आघाडीवर असल्याचं पहिल्या कलमधून समोर आलं आहे. तर भाजपचे उमेदवार पिछाडीवर होते. पंढरपुरात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी चुरशीची लढत सुरू आहे.
सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास भाजपचा उमेदवार समाधान आवताडे आघाडीवर आहेत. जवळपास 400 मतांनी आघाडीवर असल्याची माहिती मिळाली आहे. भाजप राष्ट्रवादी काँग्रेसला टफ फाईट देत असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मागे सोडत आवताडे यांनी जोरदार मुसंडी मारत आघाडी घेतली आहे.
आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर 17 एप्रिल रोजी पोट निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी एकूण १९ उमेदवार रिंगणात उतरले होते. २ लाख २४ हजार ०६८ मतदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला होता.
मतमोजणी केंद्रावर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात आली आहे. कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर ही मतमोजणी होत असल्याने विशेष काळजी घेतली जात आहे. कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे लॉकडाऊन आहे आणि पंढरपुरात जमावबंदीचा आदेश देण्यात आले आहेत.