'आरटीओतल्या चिरीमिरीसाठी दलाल आणि 'ते' नागरिक दोषी'

आरटीओ अधिकारी किरकोळ चिरीमिरी स्विकारत असतीलही पण

Updated: Jul 16, 2017, 05:45 PM IST
'आरटीओतल्या चिरीमिरीसाठी दलाल आणि 'ते' नागरिक दोषी' title=

नाशिक : आरटीओ अधिकारी किरकोळ चिरीमिरी स्विकारत असतीलही, पण यासाठी दलाल आणि झटपट काम करुन घेण्याच्या प्रयत्नात असलेले नागरिकच दोषी आहेत असा निष्कर्ष परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काढला आहे. नाशिकमध्ये एसटी सेना कर्मचारी संघाच्या कार्यक्रमात दिवाकर रावते बोलत होते. लोकांनी थोडा वेळ काढल्यास भ्रष्टाचार होणार नाही असा सल्लाही दिवाकर रावते यांनी यावेळी दिला.

राज्याचा परिवहन विभागातले अधिकारी, कर्मचारी किती कष्टानं काम करतात याचे गोडवेही रावतेंनी गायले. आरटीओच्या इतक्या आकंठ प्रेमात बुडालेल्या रावते यांना, करदाता मतदारराजा काय म्हणेल याचा मात्र यावेळी विसर पडला.