नितेश महाजन, झी मीडिया, जालना : राज्यात 11 ते 20 वयोगटातील मुलांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढलं आहे. राज्यात 1 हजार 711 मुलं कोरोनाबाधित आढळून आली आहेत. अलीकडच्या 20 दिवसांतील ही आकडेवारी आहे. लहान मुलांना कोरोनाचा एकमेकांना संसर्ग होत असल्याने कोरोनाची आकडेवारी वाढत आहे. या मुलांचं लसीकरण तातडीने केलं पाहिजे असं टास्क फोर्सचही मत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
लहान मुलांचं लसीकरण आणि ज्येष्ठांना बूस्टर डोस देण्याची मागणी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात बोलत होते
आरोग्य विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र
दिवाळीनंतर दुसऱ्या सत्रात शाळेचे सर्वच वर्ग भरवण्याची मागणी आता पालकांकडून होऊ लागली आहे. त्यामुळे 5 वी पासून पुढील वर्ग आधीच उघडले असून 1 ली ते 4 थी पर्यंतचे वर्ग भरवण्यास शिक्षण विभागाला आरोग्य विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आलं असून याबाबत आता मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी महत्त्वाची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
चिकून गुनियाचं प्रमाण वाढतंय
राज्यात चिकून गुनियाचं प्रमाण वाढलं असून या संदर्भात नागरिकांनी काळजी घ्यावी तसंच आरोग्य विभागाला देखील उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आलंयाच ते म्हणाले.
लसीकरणाचं टार्गेट
राज्यात नोव्हेंबर अखेर पर्यंत लसीकरण पूर्ण करण्याच टार्गेट ठेवण्यात आलं असून जास्तीत जास्त 15 डिसेंम्बरपर्यंत पहिल्या डोसचं लसीकरण पूर्ण होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.