आजारपणाला कंटाळून ११ वर्षीय मुलीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

 गौरीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या.

Updated: Jan 14, 2020, 11:25 AM IST
आजारपणाला कंटाळून ११ वर्षीय मुलीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

पिंपरी चिंचवड : गौरी राऊत या ११ वर्षीय मुलीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गौरीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. पिंपळे गुरव परिसरातील घटना असून याबद्दल स्थानिकांकडून दु:ख व्यक्त केले जात आहे. 

पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस इतरही कारणांचा शोध करत आहेत.